गोव्यात जीएसटी संकलनात झाली वाढ

राज्य दुसऱ्या क्रमांकावर; गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 टक्के अधिक महसूल
GST
GST Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात जीएसटी महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 टक्के इतकी वाढ झाली आहे. गोवा राज्याच्या जीएसटी संकलनामध्येही गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत 43 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्या महिन्यात राज्यात 433 कोटींचा जीएसटी संकलित करण्यात आला.

जुलै महिन्यातील वस्तू सेवा कर (जीएसटी) महसूल संकलन हे आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक आणि गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील महसुलापेक्षा 28 टक्के अधिक आहे.

गत महिन्यात 1,48,995 कोटींचा जीएसटी महसूल संकलीत झाला असून, त्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर म्हणजेच सीजीएसटीचा वाटा 23,751 कोटींचा आहे.

GST
‘ग्रेटर पणजी’ अखेर निकालात

एसजीएसटीचा वाटा 32 हजार कोटींचा

राज्यांचा वस्तू आणि सेवा कर एसजीएसटीचा वाटा 32 हजार 807 कोटींचा आहे. त्याशिवाय आयजीएसटी म्हणजे एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचा हिस्सा 79 हजार 518 (वस्तूंच्या आयातीवर संकलित 41 हजार 420 कोटी रुपयांसह) कोटींचा आहे. उपकराच्या माध्यमातून 10 हजार 920 कोटी रुपये केंद्र सरकारला मिळाले आहेत. त्यामध्ये वस्तूंच्या आयातीवर संकलित 995 कोटी रुपयांचा वाटा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com