Shigmotsav in goa
Shigmotsav in goaDainik Gomantak

पुजलेल्या नारळाचे जांबावलीत भव्य स्वागत

गुलालोत्सव 29 रोजी: सहा दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल
Published on

सासष्टी: कोंबवाडा-मडगाव येथील वै. पुरुषोत्तम पा. केणी यांच्या निवासस्थानी झालेल्या नारळाच्या पूजनाने बुधवारी जांबावलीतील शिगमोत्सवाला आरंभ झाला. हाच नारळ गुरुवारी वाजतगाजत व मिरवणुकीने केणी यांच्या घराकडून श्री विठ्ठल मंदिर, श्री दामोदर साल, आबाद फारिया रस्ता, स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून नगरपालिका चौकात आणण्यात आला व तिथून जांबावलीला नेण्यात आला. तिथे त्याची स्थापना करण्यात आली.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे मर्यादित स्वरुपात जांबावलीत शिगमोत्सव साजरा केल्यानंतर यंदा भव्य स्वरुपात व धूमधड्याक्यात पारंपरिक पद्धतीने शिगमोत्सव साजरा करण्यासाठी मठग्रामस्थ हिंदू सभेने सर्व तयारी पूर्ण केली आहे.

Shigmotsav in goa
गोव्यात शनिवारपासून ‘द लक्झरी’ परिषद

आजपासून जांबावलीत पुढील सहा दिवस शिगमोत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, स्पर्धा, नृत्य आदी कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. मंगळवार 29 रोजी वार्षिक गुलालोत्सव होणार आहे. आज संध्याकाळी 5.30 वाजता विठ्ठलवाडीहून बॅंडवादनाने मठग्रामस्थ महाजन हरदास त्रिविक्रम पै रायतुरकर यांच्या निवासस्थानी आले व नंतर वै. केणी यांच्या घरी जाऊन पूजलेल्या नारळाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली.

ही मिरवणूक मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग उर्फ भाई नायक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. जांबावली येथे नारळाची रितसर स्थापना केल्यावर सं. ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग झाला. तत्पूर्वी, बुधवारी वै. पुरुषोत्तम पां. केणी यांच्या निवासस्थानी मोहित केणी यांनी नारळाची पूजा केली. त्यानंतर रात्री 9.30 वाजता केणी यांच्या घरासमोरील रस्त्यावर वर्षपद्धतीप्रमाणे मठग्रामस्थ महाजनांतर्फे ‘सीता स्वयंवर’ हे लोकनाट्य सादर करण्यात आले. तीर्थप्रसादाने नारळ पूजनाचा कार्यक्रमाचा समारोप झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com