Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sunburn Goa 2024: उत्तर की दक्षिण यावरुन वादात सापडलेल्या सनबर्न महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर
Skrillex, DJ Peggy Gou
Published on
Updated on

Sunburn Goa 2024

पणजी: ग्रॅमी पुरस्कार विजेता EDM कलाकार Skrillex आणि दक्षिण कोरियाची DJ कलाकार Peggy Gou डिसेंबरमध्ये गोव्यात होणाऱ्या सनबर्नमध्ये सादरीकरण करताना दिसून येतील. दोघांची नावे सनबर्न गोवाच्या 2024 आवृत्तीसाठी हेडलाइनर्सच्या यादीत सामील झाली आहेत.

गोव्यात दरवर्षी सनबर्न संगीत महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी उत्तर ऐवजी दक्षिण गोव्यात महोत्सव आयोजित करण्यावरुन वाद होत असताना सनबर्न मात्र त्यांचा नियोजित कार्यक्रमानुसार मार्गक्रमण करताना दिसत आहे.

Skrillex आणि Peggy Gou यांच्या सनबर्न गोवा 2024 मध्ये झालेल्या एन्ट्रीने सर्वजण उत्साहीत झाले आहेत, असे सनबर्न फेस्टिव्हलचे CEO करण सिंग म्हणाले.

दरम्यान, गोव्यात 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान आयोजित सनबर्नवरुन राज्यात वाद सुरु आहे. दरवर्षी उत्तरेत होणाऱ्या या उत्सवाचे ठिकाण बदलून दक्षिणेत केल्याने वादाला तोंड फुटले आहे. महोत्सवाची जागा अद्याप निश्चित झाली नसली तरी दक्षिणेत सनबर्न होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर
Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

सनबर्नने यापूर्वीच महोत्सवासाठी पूर्व नोंदणी आणि तिकीटविक्री सुरु केलीय. यानंतर महोत्सवात सुरुवातीला ॲलेसो, KSHMR आणि ARGY या कलाकारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांची नावे समोर आली आहेत.

Skrillex डबस्टेपमधील एक प्रमुख कलाकार म्हणून ओळखला जातो. बंगारंग, स्केरी मॉन्स्टर्स आणि नाइस स्प्राइट्स यासारखे हिट्स त्याच्या नावावर आहेत. त्यांने जस्टिन बीबर आणि डिप्लो यांच्यासोबत कोलॅब केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com