पणजी : राज्यातील क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विविध क्रीडा संघटनांच्या समस्या, त्यांच्या मागण्या आणि त्यांची संबंधित विषयावरील मते क्रीडामंत्री गोविंद गावडे जाणून घेणार आहेत. यासंबंधी राज्यातील सर्व क्रीडा संघटनांच्या सचिवांशी ते संवादही साधतील. (Govind Gawde to address sports problem in Goa)
क्रीडामंत्र्यांची विविध राज्यस्तरीय क्रीडा संघटनांच्या सचिवांसोबत संयुक्त बैठक सोमवारी (ता. 23) सकाळी साडेदहा वाजता पाटो-पणजी येथील पर्यटन भवनात होईल. या संदर्भात राज्यातील सर्व संलग्न क्रीडा संघटनांना गोवा क्रीडा प्राधिकरणाचे मागील आठवड्यात पत्र पाठविले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रदीर्घ कालावधीनंतर क्रीडामंत्री आणि क्रीडा संघटना यांच्या संयुक्तपणे संवाद साधला जाणार आहे. क्रीडामंत्रिपद स्वीकारल्यानंतर गावडे यांनी धडाका लावला असून त्यांनी क्रीडाक्षेत्राला योग्य दिशा दाखविण्यास प्राधान्य दिले आहे.
राज्यात क्रीडा सुविधा परिपूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य क्रीडामंत्री गावडे यांनी बाळगले आहे. त्यादृष्टीने त्यांची क्रीडा संघटनांच्या सचिवांसोबतची बैठक महत्त्वाची मानली जाते. सुसूत्र क्रीडा कारभारासाठी राज्य प्रशासनाने अजय गावडे यांची क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदी नियुक्ती केली असून त्यांच्याकडेच गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त ताबाही देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.