Govind Gaude: "मी भाजपमध्येच राहणार" गावडेंची स्पष्टोक्ती; दामू नाईंकावरही साधला निशाणा, म्हणाले "शिस्तभंगाची कारवाई करणार का?"

Goa BJP: माजी मंत्री गोविंद गावडे यांनी आज (२२ जून) माशेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

माशेल: आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर थेट टीका केल्यानंतर माजी मंत्री गोविंद गावडे यांना अखेर मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज (२२ जून) माशेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

गोविंद गावडे म्हणाले, “मी भाजपसोबतच राहणार आहे. आमदारकीचा राजीनामा देणार किंवा भाजप सोडणार असल्याच्या अफवा असून त्या खोट्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील ‘विकसीत भारत 2047’ आणि ‘विकसीत गोवा’ या संकल्पना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

Govind Gaude
Goa Tourist Attack: "मदतीसाठी ओरडत होतो, कोणीच आलं नाही", गोव्यात दिल्लीच्या पर्यटकांना ऑटोचालकाकडून बेदम मारहाण; शेअर केला धक्कादायक अनुभव

गोविंद गावडे यांनी यावेळी बोलताना गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर नाव न घेता जोरदार टिका केली. ज्या माणसाला आपल्या पदाचा ‘वालोर’ म्हणजे प्रतिष्ठा समजत नाही, तो माझ्याबद्दल बोलताना ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे असभ्य शब्द वापरतो. अशा व्यक्तीविरोधात पक्ष काही कारवाई करणार आहे का? असा सवाल उपस्थित करत गावडे यांनी अप्रत्यक्षपणे दामू नाईकांच्या वक्तव्यावर रोष व्यक्त केला.

Govind Gaude
Goa Cabinet: दिगंबर कामतांचे मंत्रिपद नक्की? दिल्लीत ठरणार यादी; इतर नावांविषयी वाढली उत्कंठा

गावडे पुढे म्हणाले, "2019 मध्ये शिरोड्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांना विजयी करण्यासाठी मी जीव ओतून काम केले. भाजपचे कार्यकर्ते शांत होते, तेव्हा मी त्यांच्या प्रचारात गुंतलो होतो. त्यांचा विजय कमी मतांच्या फरकाने झाला आणि त्या मतांचा मोठा हिस्सा माझ्या पाठिंब्यामुळे मिळाला होता."

गावडेंनी शिरोडकरांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यासोबतच त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणावरही नाराजी व्यक्त केली. पक्षात दिलेल्या योगदानाची त्यांना किंमत चुकवावी लागली. निर्णयप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com