Govind Gaude Resigns
Govind Gaude ResignsDainik Gomantak

गोविंद गावडेंचा आमदारकीचा राजीनामा

भाजपची ऑफर स्वीकारुन करणार पक्षप्रवेश, उमेदवारीही जवळपास निश्चित
Published on

पणजी : प्रियोळचे अपक्ष आमदार आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपण अपक्ष आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. आता घोषणा केल्याप्रमाणे गोविंद गावडेंनी (Govind Gaude) आपला राजीनामा सादर केला आहे. (Latest news on Govind Gaude Resignation)

Govind Gaude Resigns
गोविंद गावडेंच्या भाजपप्रवेशाची तारीख ठरली

गोविंद गावडे हे गोव्यातील प्रियोळ (Priol) मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शवत आपलं मंत्रिपदही मिळवलं होतं. अपक्ष आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज मंगळवारी संध्याकाळी चार वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे प्रियोळमध्ये भाजपचा उमेदवार जवळपास निश्चित मानला जात आहे.

दरम्यान भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी गोविंद गावडे भाजपमध्ये आल्यास त्यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. तसेच पक्षातून जे लोक या निर्णयाला विरोध करतील त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल असेही स्पष्ट केले होते. त्यामुळे गेला आठवडाभर गोविंद गावडेंच्या भूमिकेकडे सर्वाचंच लक्ष लागून राहिलं होतं. गोविंद गावडेंनी आपली भूमिका शेवटपर्यंत जाहीर न केल्याने गावडे भाजपची (BJP) ऑफर स्वीकारतात की नाकारतात अशा चर्चाही रंगू लागल्या होत्या. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत गावडेंनी भाजपची वाट धरल्याचं चित्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com