Governor P.S Shridhran Pillai: जग आज बोन्साय तंत्राचा निर्माता म्हणून जपानकडे पाहत असले तरी मुळात ही कला भारतीय आहे. पुर्वीच्या अनेक ग्रंथांत विशेषतः आयुर्वेदामध्ये या कलेचा ५ हजार वर्षापूर्वीपासून उल्लेख आहे. त्यामुळे केवळ ५०० वर्षे ही कला विकसित केल्याचे मानले गेलेल्या जपानची ती कला असूच शकत नाही.
वामन वृक्ष कला नावाने ही कला भारतात जन्मली आणि फुलली. त्यावर संशोधनपर पुस्तक लिहीले असून दोन आठवड्यात ते वितरणासाठी उपलब्ध असेल, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी ‘गोमन्तक’ शी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, संस्कृत बोलणाऱ्या एका गावाला भेट दिली असता या कलेची माहिती मला मिळाली. मी त्यावर संशोधन सुरु केले.
खरेच अशी कला आपल्याकडे अस्तित्वात होती का याचा शोध घेतला. यासाठी अनेकांशी चर्चा केली.
जून्या संस्कृत ग्रंथात याच्या पाऊलखुणा, ठसे शोधले. ही कला कशी जन्मली, असे त्यावेळी करण्याची गरज का भासली असावी, याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या खटाटोपातून एक पुस्तक आकाराला आले आहे. माझे ते 200 वे पुस्तक असेल, याचा मला सार्थ अभिमान आहे.
वामन वृक्ष कला
राजभवनात वामन वृक्ष कलेवर आधारीत उद्यान उभारले आहे. ही कला चीनमध्ये गेली, जपानमध्ये गेली. आज चीन बोन्साई वृक्षांचा मोठा निर्यातदार मानला जातो. आमच्याच कलेचा आम्हाला विसर पडला आहे. ती कला आपल्याकडे पूनरुज्जीवीत व्हावी, भारतीय भूमी या कलेचे जननी आहे यावर शिक्कामोर्तब व्हावे असा उद्देशही या पुस्तक निर्मितीमागे आहेत, असेही राज्यपाल म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.