Taleigao: छत काढले दुरुस्तीला, पावसाने दिला तडाखा; ताळगाव प्राथमिक शाळेच्या वर्गात भरले पाणी, साहित्याचे नुकसान

Taleigao School: २० मे पासून गोव्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिलेला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामात विलंब का केला? असा सवाल सिसिल रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला आहे.
Roof Work
Roof DamageDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ताळगावमधील शासकीय प्राथमिक शाळेची अवस्था जोरदार पावसामुळे अतिशय वाईट बनली आहे. शाळेचे छत दुरुस्तीच्या उद्देशाने काढण्यात आलेले असताना अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण शाळेत पाणी शिरले असून अंतर्गत साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या गंभीर बाबीकडे आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्या सिसिल रॉड्रिग्ज यांनी लक्ष वेधत स्थानिक आमदार जेनिफर मोन्सेरात आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

Roof Work
Goa Rain: गोव्यात एकीकडे धो-धो पाऊस, दुसरीकडे रस्ता हॉटमिक्सिंगचे काम; पावसाळी कामांच्या नियोजनाचा फेरविचार हवा

२० मे पासून गोव्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिलेला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामात विलंब का केला? असा सवाल सिसिल रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला आहे. शाळेचे नवे शैक्षणिक वर्ष ४ जूनपासून सुरू होणार असताना सरकार या शाळेच्या स्थितीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Roof Work
Goa Rain: पणजीवर 800 कोटी खर्च केले, इतर शहरांकडेही लक्ष दिले असते तर पावसात इतकी दैना झाली असती का?

४ जूनपासून विद्यार्थ्यांना कोठे बसवणार?

४ जूनपासून शाळा सुरू होणार आहे, पण या विद्यार्थ्यांना कोठे बसवणार? त्यांच्या शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे का? असा सवाल देखील सीसिल रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला. ताळगाव रोटरी क्लबने या शाळेसाठी अत्याधुनिक सुविधा स्वतःच्या खर्चातून पुरविल्या होत्या, पण आता त्या सर्व सुविधा पावसामुळे जलमय झाल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com