Goa: गोवा हे राजकारणी अन् पोलिसांच्या आशीर्वादाने वेश्‍याव्यवसायाचे केंद्र बनतेय!

Goa: गोव्यात बार अँड रेस्‍टॉरंट्‌स हे व्यवसाय आदी मर्यादित होते, पण आता हे व्यवसाय लोकवस्‍तीपर्यंत पोचले आहेत.
Roshan Mathias | Arun Pandey
Roshan Mathias | Arun PandeyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: गोव्‍यात वेश्‍याव्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे ‘टाटा इन्‍स्‍टिट्यूट’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून स्‍पष्‍ट झाले आहे. पर्यटनाच्या अनुषंगाने त्‍यात अधिक वाढ झालेली आहे. पूर्वी पर्यटनस्थळे, बार अँड रेस्‍टॉरंट्‌स आदीपुरताच हा व्यवसाय सीमित होता. परंतु आता तो लोकवस्‍तीपर्यंत पोचला आहे.

दरम्यान, त्यामुळे यंत्रणा आत्ताच जागृत झाली नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम आम्हाला भोगावे लागतील, अशी भीती ‘अन्याय रहित जिंदगी’चे (अर्ज) प्रमुख अरुण पांडे यांनी व्यक्त केली. गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात ते बोलत होते. कांदोळी येथील समाजकार्यकर्ते रोशन माथायस हेसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Roshan Mathias | Arun Pandey
Goa Petrol-Diesel Price: एक वर्षानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट, जाणून घ्या गोव्यासह देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर

यापूर्वी गोव्यातील वेश्‍याव्यवसायावर जे अहवाल प्रसिद्ध झाले, ते बिगरसरकारी संस्थांचे होते. त्यामुळे आकडे चढवून सांगत असल्याचे सांगून सरकार ते नाकारत होते. परंतु आता हा टाटा इन्‍स्‍टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने (टिस) प्रसिद्ध केलेला अहवाल सरकार नाकारू शकत नाहीत.

हा सात वर्षांपूर्वीचा अहवाल असल्याने आता त्‍यात निश्‍चितपणे वाढ झालेली असेल. सरकारने हा अहवाल संकेतस्थळावरून हटवायला सांगितल्याने त्याचे गांभीर्य किती आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असे यावेळी सांगण्‍यात आले.

यंदा 19 महिलांची वेश्‍याव्यवसायातून सुटका केली असून हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. 2020 मध्‍ये 30 तर 2021 मध्‍ये 35 महिलांची सुटका केली होती. कोविडनंतर या व्यवसायात अधिक वाढ झालेली आहे. आता ऑनलाईन पद्धतीनेही हा व्यवसाय फोफावत आहे.

तसेच ग्राहकांना स्थळांची माहितीही ऑनलाईनच दिली जाते. इतकेच नव्हे तर स्थानिक महिलासुद्धा या व्यवसायात असल्याचा दावा केला जातोय. त्‍यामुळे ही कीड वेळीच ठेचणे गरजेचे आहे, असे माथायस म्‍हणाले.

Roshan Mathias | Arun Pandey
Goa Police उपनिरीक्षकपदाची भरती प्रक्रिया न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता!

...तर गोव्‍याची स्‍थिती मुंबईसारखी- पांडे

ग्राहकांना आणण्यासाठी विशिष्ट माणसे नेमलेली असतात. ‘आम्ही तुम्हाला सुविधा पुरवू, तेथे नृत्य करायला मिळेल’ अशी आमिषे दाखवून ते ग्राहकांना इप्सितस्थळी आणतात. येथे देशाच्‍या विविध राज्‍यांबरोबरच बांगलादेश, नेपाळ येथूनही मुलींना आणून वेश्‍याव्यवसायात लोटले जाते. त्‍यासाठी त्‍यांना नोकरीचे आमिष दाखविले जाते. ही स्थिती अशीच राहिली तर भविष्यात मुंबईसारखी परिस्थिती गोव्यात निर्माण होईल, असा इशारा पांडे यांनी दिला.

कुंपणच शेत खातंय- रोशन माथायस

आपण गेली सात वर्षे वेश्‍याव्यवसायाविरोधात कार्यरत आहे. पूर्वी हॉटेल, डॉरमेटरी आदी ठिकाणी हा व्यवसाय चालायचा. परंतु आता तो आपल्‍या घराशेजारी येऊन पोहोचलाय. पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर, तेच संबंधितांना तेथून जायला सांगतात.

ते निघून गेल्यावर पोलिस तिथे पोहोचतात तेव्हा ‘त्या’ फ्लॅटला टाळे लावल्याचे त्यांना आढळून येते. यावरून कुंपणच शेत खात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अशा प्रकारांची माहिती देण्यास कोण पुढे येईल, असा सवाल रोशन माथायस यांनी उपस्थित केला.

राजकीय नेत्यांच्या मुलांची भागीदारी

राज्यातील विविध आस्थापनांमध्ये, बार अँड रेस्टॉरंटमध्‍ये जो वेश्‍‍याव्‍यवसाय चालतो, त्‍यात राजकीय नेत्यांच्या मुलांची भागीदारी असते. ते या व्यवसायात गुंतलेले असल्याने कारवाई होत नसल्याचे खळबळजनक विधान रोशन माथायस यांनी केले.

ते म्हणाले, अशा कृत्यांची माहिती जेव्हा पोलिसांना पुरविली जाते, तेव्हा माहिती देणाऱ्या व्यक्तीची गोपनीयता राखणे गरजेचे असते. मात्र त्याबद्दलची शाश्‍वती नागरिकांना राहिलेली नाही. त्यामुळेच कोण तोंड उघडायला धजत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com