Konkani Language: 'सरकारी नोकरीसाठी ‘कोकणी’ची अट नको'! फोंड्यात धरणे आंदोलन; मराठी राजभाषा निर्धार समितीची मागणी

Marathi rajbhasha samiti: या बैठकीला मराठी राजभाषा निर्धार समितीचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, गोविंद देव, अनिता तिळवे तसेच शाणूदास सावंत व इतर उपस्थित होते.
Marathi rajbhasha samiti
Marathi rajbhasha samitiDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फर्मागुढी येथील मराठीचा महिला मेळावा येत्या ९ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याची रूपरेषा ठरवण्यासाठी फोंड्यातील विश्‍व हिंदू परिषद सभागृहात एक बैठक घेऊन कार्यक्रम निश्‍चिती करण्यात आली.

या बैठकीला मराठी राजभाषा निर्धार समितीचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, गोविंद देव, अनिता तिळवे तसेच शाणूदास सावंत व इतर उपस्थित होते. दरम्यान, सरकारी नोकरीसाठी कोकणी परीक्षा उत्तीर्णची अट घातल्याने येत्या बुधवारी २९ रोजी फोंड्यात धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

Marathi rajbhasha samiti
Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

गुणवत्ता असली तरी सरकारी नोकरीसाठी कोकणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक असल्याचे सरकारने जाहीर केल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. हा निर्णय म्हणजे मराठीची गळचेपी असून त्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी साडेतीन वाजता फोंड्यातील दादा वैद्य चौकात धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

Marathi rajbhasha samiti
Marathi Language: मंगेशीत मराठीप्रेमी एकवटले! राजभाषेसाठी घेणार 20 मेळावे; मातृशक्ती, युवाशक्ती गतिमान

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी एका महिला समितीची निवड करण्यात आली. या महिला मेळावा समितीत गोवा महिला प्रमुख अनिता तिळवे, फोंडा प्रखंड महिला प्रमुख सुप्रिया केतकर, सुचित्रा बांदेकर, सुशीला गावस, अनुराधा मोघे, दमयंती गावस व इतर महिलांचा समावेश आहे. येत्या ३० तारखेला संध्याकाळी चार वाजता होणाऱ्या मराठी मेळावा आयोजन समितीच्या बैठकीत आपली नावे द्यावीत असे आवाहन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com