रोजगार देण्‍यास सरकार अपयशी

Jobs in Goa : नोकऱ्यांबाबत हे सरकार तरुणाईची चेष्टा करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे गोवा उपाध्यक्ष ॲड. सुरेल तिळवे यांनी पत्रकार परिषदेत केला.
Jobs in Goa
Jobs in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Jobs in Goa : गोमंतकीय युवकांना रोजगार पुरविण्यास सत्ताधारी सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. केवळ निवडणुकीवेळीच भाजपला बेरोजगारी आठवते. तो आता त्‍यांचा अजेंडा झालेला आहे. नोकऱ्यांबाबत हे सरकार तरुणाईची चेष्टा करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे गोवा उपाध्यक्ष ॲड. सुरेल तिळवे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी हेंझेल फर्नाडिस, अनुप कुडतरकर व राजदीप नाईक यांचीही उपस्थिती होती.

Jobs in Goa
गोव्याला सुरक्षित अन्न उपायांसाठी सतत तीन वर्षे प्रथम पुरस्कार

तिळवे म्हणाले की, विद्यमान सरकारने युवकांची क्रूर चेष्टा चालवलेली आहे. निवडणुकीपूर्वी दहा हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. मात्र निवडणुका संपताच आता ‘यापुढे नोकऱ्या देता येणार नाहीत’ असे मुख्यमंत्री सांगत आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी फंड उभारणे हा भाजप सरकारचा नोकऱ्यांच्या आश्वासनामागील हेतू होता हे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

कुडतरकर म्हणाले की, ‘आप’ने पंजाबमध्ये नोकऱ्यांबाबत दिलेली आश्‍वासने कशी पाळली, हे गोव्यातील भाजप सरकारने एकदा पहावे. ‘आप’ने 26 हजार नोकऱ्यांची घोषणा केली होती आणि आता त्या टप्प्या-टप्प्याने भरल्‍या जात आहेत. शिवाय प्रत्येक घरात नोकरी देण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Two Sisters Found Dead in Mokhard
Kapileshwari Kavale Pond Fish Death
Gomantak TV Engineers Excellence Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com