Government Doctors: सरकारी डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर येणार निर्बंध, आरोग्यमंत्र्यांची माहिती; OPD च्या वेळा वाढवण्याचे सूतोवाच

Vishwajit Rane: आरोग्यमंत्री राणे म्हणाले, सरकारकडून चांगला पगार घेत असतानाही काही डॉक्टर खासगी क्लिनिक किंवा रुग्णालयांत प्रॅक्टिस करतात. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्ण सेवांवर प्रतिकूल परिणाम होतो.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: सरकारच्या आरोग्य व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी करार पद्धतीने सरकारी सेवेत असलेले आणि वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करू शकणार नाहीत असा प्रस्ताव आरोग्य खात्याने तयार केला असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष मनोज हरमलकर, उपनगराध्यक्ष उषा नागवेकर इतर नगरसेवक तसेच विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्यमंत्री राणे म्हणाले, सरकारकडून चांगला पगार घेत असतानाही काही डॉक्टर खासगी क्लिनिक किंवा रुग्णालयांत प्रॅक्टिस करतात. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्ण सेवांवर प्रतिकूल परिणाम होतो.

रुग्णांच्या हितासाठी आणि सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. याचबरोबर, आरोग्य विभागाने सरकारी रुग्णालयांतील बाह्य रुग्ण विभागातील (ओपीडी) डॉक्टरांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे रुग्णांना दिवसभर उपचार घेण्यासाठी जास्त वेळ ते उपलब्ध होतील, गर्दी कमी होईल आणि डॉक्टरांना रुग्णांवर अधिक लक्ष देता येईल. ओपीडी वेळ वाढवल्यामुळे उपचार प्रक्रिया सुलभ होईल आणि रुग्णांची प्रतीक्षा वेळ कमी होईल.

सर्वांत विकसीत तालुका म्हणून सध्या गोवा राज्यात पेडणे तालुका आहे आणि त्या दृष्टिकोनाने मोठ्या प्रमाणात विकास या तालुक्याचा होत आहे. पेडणे तालुक्यात मोपा विमानतळासह आलेल्या अन्य प्रकल्पांमुळे येणाऱ्या काळात या तालुक्यात चांगली आरोग्य सेवाही द्यावी लागणार आहे. पेडणे तालुक्यातील सामान्य जनतेला योग्य सेवा मिळावी यादृष्टीने आपले आणि मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.

तुये इस्पितळ लवकरच कार्यान्वित

पेडणे तालुक्यातील तुये येथे उभारण्यात आलेले बहुप्रतिक्षित नवीन रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार असून येथे स्थानिक नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. सरकारचा उद्देश नागरिकांना सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आहे. रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांसह अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नेमले जाणार आहेत, असेही राणे म्हणाले.

Vishwajit Rane
GMC Doctor Suspended: "जिथे अपमान झाला, तिथेच माफी मागितली पाहिजे" गोमेकॉ प्रकरणी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया

गोमेकॉत, जिल्हा रुग्णालयांत त्वरित अंमलबजावणी

डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिससंदर्भात गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये त्वरित अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. हा निर्णय गोवा वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्व जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तातडीने लागू केला जाणार आहे. याबाबतचे अधिकृत आदेश लवकरच काढले जातील. आरोग्य विभागाकडून यामुळे सरकारी आरोग्य सेवांची गुणवत्ता, उपलब्धता आणि विश्वासार्हता लक्षणीयरीत्या वाढेल. भविष्यात सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणखी कठोर पावले उचलली जातील, ज्यामुळे गोव्याची आरोग्य व्यवस्था राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरेल, असेही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले.

Vishwajit Rane
GMC Doctor Suspended: अखेर गोमेकॉ वादावर पडदा! डॉक्टरांचे निलंबनही रद्द; मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने संप मागे

रोजगारात स्थानिकांना प्राधान्य

तुये इस्पितळातील रोजगार संधीसाठी पहिले प्राधान्य पेडणे तालुक्यातील स्थानिक उमेदवारांना दिले जाईल. यासाठी आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्थानिक युवकांना आवश्यक कौशल्ये दिली जाणार आहेत, जेणेकरून ते रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये काम करू शकतील. तुये इस्पितळामुळे पेडणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून गंभीर आजारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय किंवा इतर शहरांमध्ये धाव घेण्याची गरज भासणार नाही असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com