सहा उपकेंद्रात दहावीच्या पहिल्या विभागातील परीक्षेला प्रारंभ

तापमान तपासून आणि सॅनिटायझ करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात येत होते
HSC Exam
HSC ExamDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली Bicholim : दहावीच्या पहिल्या विभागातील परीक्षेला (exam) आजपासून (गुरुवारी) डिचोलीत (Bicholim) उत्साहात प्रारंभ झाला आहे. गोवा (Goa) शालांत शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावीची परीक्षा दोन विभागात घेण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 10.30 वा. प्रत्यक्ष परीक्षेला सुरवात झाली असली, तरी विद्यार्थी (Students) तासभर आधीच परीक्षा केंद्राजवळ जमले होते.

HSC Exam
आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ; राजेश टोपेंना जेलमध्ये पाठवणार?

तापमान तपासून आणि सॅनिटायझ करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात येत होते. परीक्षा केंद्रातही कडकपणे एसओपी पाळण्यात येत आहे. डिचोली केंद्रात राधाकृष्ण, अवरलेडी आणि श्री शांतादुर्गा (डिचोली), सेंट क्लारा हायस्कुल (साखळी), श्री महामाया हायस्कुल (मये) आणि शिवाजीराजे हायस्कुल (खोलपेवाडी-साळ) या सहा उपकेंद्रातून ही परीक्षा घेण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com