Goa Medical College: गोव्यासाठी खुषखबर! GMC मध्ये 'या' अभ्यासक्रमांना मिळाली मान्यता

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आगामी शैक्षणिक वर्षाापसून होणार सुरूवात
Goa Medical College
Goa Medical CollegeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Medical College: गोव्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयुक्त अशी एक महत्वाची घडामोडी घडली आहे. गोवा मेडिकल कॉलेज (GMC) मध्ये एका अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने ही मान्यता दिली आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या शैक्षणिक इतिहासातील ही ऐतिहासिक कामगिरी असून याबद्दल महाविद्यालय आणि रूग्णालय प्रशानासने अभिनंदन केले जात आहे.

Goa Medical College
Goa Traffic Police: बार्देशात गेल्या दोन महिन्यांत 400 वाहन परवाने निलंबित

नॅशनल मेडिकल कमिशनने गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला जेरियाट्रिक मेडिसीन अँड इम्युनोलॉजी, हेमॅटोलॉजी आणि ब्लड ट्रान्सफ्यूजनमध्ये एमडी प्रोग्राम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. हे अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये सुरू होतील. याशिवाय पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये आणखी चार जागा वाढणार आहेत.

पोस्ट ग्रॅज्युएशनसाठीचे हे अभ्यासक्रम अत्यंत महत्वाचे असून देशात ठराविक महाविद्यालयांमध्येच हे अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे आता अशा केंद्रांमध्ये गोव्याचाही समावेश होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या उपस्थितीत ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) च्या गोव्यातील उपकेंद्रात BAMS (बॅचलर इन आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी) या कोर्सच्या पहिल्या बॅचचा प्रारंभ करण्यात आला. या पहिल्या बॅचमध्ये 100 विद्यार्थी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com