Valpoi News : मुलांवर चांगले संस्कार व्हावेत : वेदमूर्ती दिलीप छत्रे

Valpoi News : गुढी पाडव्याच्या निमित्ताने ब्रह्माकरमळी, वाळवंट येथील दत्त मंदिरात रामरक्षा पठण व महत्त्व विषयावर कार्यशाळेत छत्रे बोलत होते.
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे, त्यासाठी मुलांकडून नियमीत देवदेवतांच्या स्तोत्रांचे पठण करून घेतले पाहिजे. मुलांच्या जडण घडणीत अशा स्तोत्रांचा चांगला प्रभाव पडतो, असे प्रतिपादन आंबेडे येथील वेदमूर्ती दिलीप छत्रे यांनी केले.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने ब्रह्माकरमळी, वाळवंट येथील दत्त मंदिरात रामरक्षा पठण व महत्त्व विषयावर कार्यशाळेत छत्रे बोलत होते. छत्रे पुढे म्हणाले की, देवतांची स्तोत्रांचे उच्चारण शुध्द असले पाहिजे. त्यासाठी दररोज सराव केला पाहिजे. लक्षपूर्वक म्हटले पाहिजे. आजच्या नव्या पिढीला योग्य वळण बालवयातच लावण्याची गरज आहे.

पूर्वीच्या काळी रोज सायंकाळी देवघरात बसून आरत्या, स्तोत्रे म्हटली जात होती. बदलत्या काळात त्यांचे विस्मरण होत चालले आहे. नवी पिढी नको त्या गोष्टींकडे आकर्षित होत आहे, हे थांबले पाहिजे, असे ते म्हणाले.

Valpoi
Goa Today's News Wrap: लोकसभा निवडणूक, गुन्हे, पर्यटन विश्वातील ठळक घडमोडींचा आढावा

सोमनाथ गावकर यांनी ओळख करून दिली. शिक्षक अनंत कुंभार यांनी छत्रे यांना मानचिन्ह प्रदान केले. शिक्षक किशोर केळकर यांनी आभार मानले. यावेळी बालसंस्कार कार्यशाळा दर महिन्याला घेण्याचे ठरविण्यात आले. ३५ पालक व मुलांनी यात भाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com