Tanishka Purument Fest: चला, पावसाळ्यापूर्वीची बेगमी करू या! ‘तनिष्का’ पुरुमेंत फेस्तला कांपाल-पणजीत प्रारंभ

Tanishka Purument Fest Panaji 2026: गोमन्तक तनिष्का व्यासपीठ आयोजित ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त’ला आजपासून सुरुवात होत असून तनिष्का पुरुमेंत फेस्तचे उद्घाटन पणजी नगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्या हस्ते होणार आहे.
Goa pre monsoon shopping festival Tanishka
Goa pre monsoon shopping festival TanishkaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमन्तक तनिष्का व्यासपीठ आयोजित ‘तनिष्का पुरुमेंत फेस्त’ला आजपासून सुरुवात होत असून तनिष्का पुरुमेंत फेस्तचे उद्घाटन पणजी नगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्या हस्ते होणार आहे. पुरुमेंत हा गोव्याचा सांस्कृतिक वारसा. काळ कितीही बदलू दे, पण इथल्या दैंनदिन जीवनातील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी बदलणार नाहीत.

पुरुमेंतही अशीच गोष्ट आहे. ज्याचा वारसा आजही घराघरात जपला जातो. महिलांचा या वर्षी पुरुमेंत चांगला व्हावा यासाठी गोमन्तक तनिष्का व्यासपीठच्या सदस्यांनी विशेष कष्ट घेतले आहेत. यंदा तनिष्का पुरुमेंत फेस्त तीन दिवस भरवण्यात येत आहे.

Goa pre monsoon shopping festival Tanishka
Goa Malaria Cases: मलेरियावर यशस्वी मात! गेल्या 9 वर्षात एकाचाही मृत्यू नाही, दरमहा सरासरी 93 रुग्ण तरीही नियंत्रण कायम!

तनिष्का पुरुमेंत फेस्तचे चौथे वर्ष असून पेडणे ते काणकोणपर्यंत प्रसिद्ध असणारे पुरुमेंतचे सर्व जिन्नस इथे एका छताखाली मिळणार आहेत. बेती-वेरे मधील खारे मासे (नुस्ते), मुळगावमधील खळातली तोरां, लोणचे, पर्येतील शेवया - फणसाचे पापड, पालीये -मांद्रे- हरमल गावातील प्रसिद्ध मिरची, सोलां (आमसुलं), उकडे तांदूळ, अळसांदे, चवळी, काणकोणमधील प्रसिद्ध मिरची, तांदूळ, ताज्या भाज्या, बिया, कणगा, आंबे, खोतीगावमधील प्रसिद्ध सेंद्रिय गूळ, कोकम, मसाले, वास्को- बायणातील विविध प्रकारचे खारे नुस्ते या पुरुमेंत फेस्तामध्ये मिळतील. शिवाय गावठी मीठ, आमटाण, पापड - वडियो, सांबार मसाला, घरगुती गरम मसाला, गावठी हळद, लोणच्यासाठी कैरी, खोबरेल तेल, नाचणी, गावठी पोहे, हळद -मिरी अशा असंख्य गोष्टी मिळतील. सकाळी दहा वाजता ते रात्री आठ पर्यंत फेस्त सुरू असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com