'गोमन्तक पुरुमेंत फेस्त'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शेतकऱ्यांकडून उत्पादनांची थेट विक्री; नागरिकांसाठी ठरतंय आकर्षण

Purumentachem Fest 2026: ‘गोमन्तक पुरुमेंत फेस्त’ला पणजीतील नागरिकांचा मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळत आहे.
Purumentachem Fest 2026
Purumentachem Fest 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘गोमन्तक पुरुमेंत फेस्त’ला पणजीतील नागरिकांचा मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळत आहे. तनिष्का व्यासपीठ आयोजित या फेस्तमध्ये पुरुमेंतासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी, तेही योग्य दरात उपलब्ध असल्याने नागरिकांची गर्दी वाढत आहे.

डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स गार्डन कांपाल येथे भरलेल्या या बाजारात पेडणे ते काणकोणपर्यंतच्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. हरमलची मिरची, बेती-वेरेतील खारी मासळी, मुळगावमधील खळातली तोरां, पर्येतील शेवया व फणसाचे पापड, तसेच पालये-मांद्रे-हरमलमधील प्रसिद्ध मिरची यांसह विविध पारंपरिक उत्पादने येथे उपलब्ध आहेत.

काणकोणमधील तांदूळ, ताज्या भाज्या, बिया, आंबे, खोतीगावचा सेंद्रिय गूळ, कोकम, मसाले आणि वास्को-बायणातील खारे मासे यामुळे हा फेस्त अधिक खास ठरत आहे. गावठी मसाले, हळद आणि विविध गोड पदार्थांनाही चांगली मागणी आहे.

या फेस्ताचे आणखी एक आकर्षण म्हणजे कुणबी साडी व त्यापासून बनवलेली विविध उत्पादने तसेच करवंद, जांभूळसारखा रानमेवा, गावठी भाजी, केळी, अननस, कोकम सरबत, विविध ज्यूस आणि आवळा कॅण्डी यांचा आस्वाद घेत नागरिक खरेदी करताना दिसत आहेत.

पारंपरिक चवींचा आणि स्थानिक उत्पादनांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी हा पुरुमेंत फेस्त नागरिकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.

Purumentachem Fest 2026
Goa Drug Case: शाळेजवळ ड्रग्स विक्री; केरळच्या युवकाला अटक, अमलीपदार्थ विरोधी पथकाची मांद्रे येथे कारवाई

‘गोमन्तक-तनिष्का व्यासपीठ’ आयोजित पुरुमेंत फेस्तात मी मागील दोन-तीन वर्षांपासून सहभागी होत असून येथे नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभतो. खरेदी चांगली होत आहे. सर्वच प्रकारचे साहित्य मिळत असल्याने पणजीसोबतच शेजारील भागातील नागरिकदेखील आवर्जून भेट देतात.

- गीता मांद्रेकर, विक्रेती

Purumentachem Fest 2026
Goa mining: आनंदम, व्यंकटेश्वरना प्रत्येकी दोन खाण पट्टे, चार खाणपट्ट्यांचा लिलाव पूर्ण; दोन पट्ट्यांचा निर्णय सुनावण्‍यांनंतर

आमच्याकडे विविध प्रकारची स्वतः बनविलेली लोणची, मसाले व इतर साहित्य उपलब्ध आहे. ‘तनिष्का व्यासपीठा’द्वारे महिलांना स्वयंपूर्ण करण्याच्या अनुषंगाने हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. नागरिकांचादेखील चांगला प्रतिसाद लाभत आहे.

- ज्योती वळवईकर, विक्रेती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com