Gomantak Marathi Academy: मराठीची गळचेपी होऊ देणार नाही! मराठी अकादमीच्या आमसभेत वज्रनिर्धार

Gomantak Marathi Akadami: मराठीची गळचेपी केली जात असेल तर त्याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय पर्वरी येथे झालेल्या आमसभेत घेण्यात आला
Gomantak Marathi Akadami: मराठीची गळचेपी केली जात असेल तर त्याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय पर्वरी येथे झालेल्या आमसभेत घेण्यात आला
Gomantak Marathi AkadamiDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: राज्यात विविध स्तरांवर, तसेच सरकारी कार्यालयांत काही सरकारी अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेची गळचेपी करण्यात येते. अशा अधिकाऱ्यांवर नजर ठेवून राज्यात मराठी भाषेलाही सहभाषेचा दर्जा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, तसेच सरकारी कार्यालये वा आस्थापनांत मराठीची गळचेपी केली जात असेल तर त्याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय पर्वरी येथे झालेल्या आमसभेत घेण्यात आला.

गोमंतक मराठी अकादमीची आमसभा अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर, सचिव भरत बागकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी गोवा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेताना मराठी विषयात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आमसभेत ११ रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. कार्यकारिणीवरील रिक्त असलेल्या एका जागेसाठी प्रकाश कळंगुटकर यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रभाकर ढगे तर सदस्य म्हणून श्यामसुंदर कवठणकर, महादेव गवंडी यांनी निवडणूक प्रक्रिया हाताळली.

यावेळी झालेल्या चर्चेत सुदेश कोचरेकर, नीलेश बुगडे, प्रभाकर ढगे, हेमंत दिवकर, उदय ताम्हणकर, प्रकाश धुमाळ, विठ्ठल गवस, महादेव गवंडी, गुरुदास सावळ, नरेंद्र आजगावकर, श्यामसुंदर कवठणकर आदींनी विविध सूचना केल्या. स्वागत व प्रास्ताविक आमोणकर यांनी केले. बागकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले.

Gomantak Marathi Akadami: मराठीची गळचेपी केली जात असेल तर त्याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय पर्वरी येथे झालेल्या आमसभेत घेण्यात आला
Marathi Literary conference : पर्वरी येथे आज मराठी राजभाषा साहित्य संमेलन

सरकारी खात्यांना देणार निवेदन

जे सरकारी अधिकारी मराठी भाषेबाबत दुजाभाव करतात, त्यांच्याविरोधात आवाज उठविण्यासाठी या आमसभेत निर्णय घेण्यात आला. विविध सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन देऊन मराठीची गळचेपी थांबविण्यासाठी निवेदन देण्याचा निर्णय या आमसभेत घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com