मडगाव: काणकोण व केपे या दोन मतदारसंघांतील महिलांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यावर आता ‘गोमन्तक’चे जनमन उत्सव सर्वेक्षण आता कुडचडे मतदारसंघात सुरू झाले आहे. शेळवण येथील सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेल्डे येथे या उपक्रमाची सुरूवात झाली.
शेल्डे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या कामणसाय व धवडवाडा येथील महिलांनी आपली मते नोंदवली. ‘गोमन्तक’च्या या उपक्रमामुळे प्रभावित झालेल्या कामणसाय येथील एका गृहस्थानेही वृत्तपत्र हातात घेऊन आपलाही या उपक्रमाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. या सर्वेक्षणातून ‘गोमन्तक’ तीन लाख महिलांपर्यंत पोहोचणार असून त्यांच्या आशा-आकांक्षा जाणून घेणार आहे. त्या पूर्ण करण्यासाठी काय करता येईल याचा आराखडा तयार करणार आहे. महिलांना भविष्यातील गोवा कसा पाहिजे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
कुठ्ठाळी मतदारसंघात झुवारीनगर येथे तर कुडतरी मतदारसंघात आज घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे हे सर्वेक्षण करण्यात आले. गोव्यातील सर्वच्या सर्व ४०सही मतदारसंघांत जाऊन ‘गोमन्तक’ महिलांची मते आजमावून घेणार आहे. आतापर्यंत प्रत्येक मतदारसंघात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.