Ghumat Vadan: गोमन्तक घुमट गंध स्पर्धा; फातोर्डा डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद
Gomantak Ghumat Gandh Competition
Gomantak Ghumat Gandh CompetitionDainik Gomantak

Gomantak Ghumat Gandh Competition: ‘गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’, श्रीनिवास सिनॉय धेंपो वाणिज्य-अर्थशास्त्र महाविद्यालय (कुजिरा-गोवा) आणि ‘डेक्कन’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अखिल गोवा ‘घुमट गंध’ (घुमट आरती) स्पर्धेचे प्रथम पारितोषिक फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्राप्त झाले.

या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्यातील महाविद्यालयांनी आवर्जून या स्पर्धेत सहभाग घेतला. युवकांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. बक्षीस वितरण कार्यक्रमाला दै. ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक, प्राचार्य डॉ. मनोज कामत, प्रा. आनंद पानवेलकर उपस्थित होते.

प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिक, चषक आणि प्रशस्तिपत्र देण्यात आली. या स्पर्धेत उत्कृष्ट घुमटवादक, उत्कृष्ट कासाळेवादक, उत्कृष्ट समेळवादक व उत्कृष्ट गायन अशी पारितोषिकेही देण्यात आली.

केतन साळगावकर, समीर गडेकर व विष्णू चोडणकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. कुजिरा येथील श्रीनिवास सिनॉय धेंपो वाणिज्य - अर्थशास्त्र महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेचे उद्‍घाटन डॉ. हेगडेवार विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Gomantak Ghumat Gandh Competition
गणेशोत्सवाच्या आधी गोव्यात हत्तीचे दर्शन...! व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

‘गोमन्‍तक टीव्ही’वर होणार सादरीकरण

पारंपरिक आरती म्हणण्याची कला युवा पिढीत रुजावी तसेच हौशी युवा कलाकारांना व्यासपीठ द्यावे या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांचे सादरीकरण ‘गोमन्‍तक टीव्ही’वर प्रसारित करण्यात येईल. तसेच या विजेत्यांना गोमन्तक भवनातील श्री गणपतीसमोर चतुर्थीनिमित्त आपले सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

आरतीतील आर्तता महत्त्वाची

आपण जी आरती गातो त्यातील गोडवा जपणे गरजेचे आहे. आरती म्हणजे आर्त भावनेने भगवंताशी साधलेला संवाद, आपल्या पूर्वाजांनी जी लोकवाद्ये निर्मिली त्याच्या सुमधुर तालावर ज्या आरत्या गायल्या जातात, त्यांचे पावित्र जपणे गरजेचे आहे.

युवा पिढीने वादन आणि गायन यात संगम साधणे तसेच शब्दोच्चारावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत स्पर्धेचे परीक्षक केतन साळगावकर यांनी व्यक्त केले.

‘घुमट हा आमचा वारसा’

उद्‍घाटन कार्यक्रमावेळी डॉ. हेगडेवार विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर म्हणाले, की घुमट हा आमचा वारसा आहे. त्याचे जतन करणे, आपली पारंपरिक आरती टिकविणे काळाची गरज असून ते कार्य आता युवकांनी करणे गरजचे आहे.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

प्रथम पारितोषिक - डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय, फातोर्डा

द्वितीय पारितोषिक - ज्ञानप्रसार मंडळ महाविद्यालय आणि संशोधन केंद्र आसगाव

तृतीय पारितोषिक - सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, खांडोळा

उत्कृष्ट घुमट वादन : सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, साखळी

उत्कृष्ट गायन ः सेंट झेविअर महाविद्यालय, म्हापसा

उत्कृष्ट कासाळेवादन ः संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य महाविद्यालय, पेडणे

उत्कृष्ट कासाळेवादन उत्तेजनार्थ ः जीव्हीएम जीपीपीआर महाविद्यालय, फोंडा

उत्कृष्ट समेळवादन ः गोवा विद्यापीठ, ताळगाव

उत्कृष्ट समेळवादन उत्तेजनार्थ ः गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, म्हापसा

Gomantak Ghumat Gandh Competition
Goa News: इस्कॉन मंदिराच्या रस्ता बांधकामाला स्थगिती; खंडपीठाचा सरकारला दणका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com