Shiroda News : गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयात संहिता अध्ययन कार्यशाळा

Shiroda News : प्रमुख पाहुणे डॉ. उपेंद्र दीक्षित यांनी संहिता पठणाचे महत्त्व आणि त्याचे नैदानिक महत्व यावेळी विषद केले.
Gomantak Ayurved Mahavidyalaya and Research Centre College in Shiroda, Goa
Gomantak Ayurved Mahavidyalaya and Research Centre College in Shiroda, Goa Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Shiroda News : शिरोडा गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र शिरोडा यांच्या संहिता सिध्दांत विभागातर्फे संहिता अध्ययन या दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी स्तवनाने झाली.

यावेळी मंचावर भारतीय संस्कृती प्रबोधिनीचे अध्यक्ष ॲड नरेंद्र सावईकर, प्रमुख पाहुणे डॉ. उपेंद्र दीक्षित, प्रमुख वक्ते डॉ. अभिजीत सराफ (नाशिक) सचिव श्री गजानन बखले, प्राचार्य डॉ. अनुरा प्र. बाळे, डॉ. बिष्णूप्रिया मोहंती(विभाग प्रमुख संहिता सिध्दांत), डॉ. समीर जोशी (सहयोगी प्राध्यापक संहिता सिध्दांत विभाग) हे उपस्थित होते.

Gomantak Ayurved Mahavidyalaya and Research Centre College in Shiroda, Goa
Tiger In Goa: पट्टेरी वाघाचा लोलयेमध्ये संचार

प्राचार्य डॉ. अनुरा बाळे यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुणे डॉ. उपेंद्र दीक्षित यांनी संहिता पठणाचे महत्त्व आणि त्याचे नैदानिक महत्व यावेळी विषद केले.

ॲड नरेंद्र सावईकर यांनी यावेळी बोलताना प्राचार्य आणि संहिता सिध्दांत विभागाच्या प्राध्यापकांनी कार्यशाळेसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. डॉ. समीर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मोहंती यांनी आभार मानले. या कार्यशाळेत १४० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Donald Trump Statement on France Protest
Best beaches in Konkan
Russian Tourists Shiroda Beach
Goa Collared Kingfisher Research
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com