Directorate of Arts and Culture: खेडेकर, कारेकर यांना गोमंत विभूषण

राजभवनात सोहळा: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान, विविध खात्यांचे मंत्री उपस्थित
Directorate of Arts and Culture
Directorate of Arts and CultureDainik Gomantak
Published on
Updated on

Directorate of Arts and Culture पद्मश्री विनायक खेडेकर आणि पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांना आज मंगळवारी गोमंत विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉल येथे हा कार्यक्रम झाला.

गोवा घटकराज्य दिनाचे औचित्य साधून कला आणि संस्कृती संचालनालय आणि माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

लोककला क्षेत्रातील सेवेबद्दल विनायक विष्णू खेडेकर यांना सन 2019-20 सालच्या गोमंत विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले, तर पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 2021-22 या वर्षाचा गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

Directorate of Arts and Culture
Revolutionary Goans: जमीन खरेदीसंदर्भात ‘आरजी’कडून दिशाभूल

यावेळी कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव पुनीत कुमार गोएल, कला आणि संस्कृती सचिव मिनिनो डिसुझा, माहिती आणि

प्रसिद्धी सचिव सुभाष चंद्रा, माहिती आणि प्रसिद्धी संचालक दीपक बांदेकर, सगुण वेळीप आदी उपस्थित होते.

दर दोन वर्षांनी पुरस्कार:-

राज्य सरकारतर्फे दर दोन वर्षांनी गोमंत विभूषण पुरस्कार देण्यात येतो. कोरोनामुळे एक वर्ष या पुरस्काराचे वितरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे या दोन्ही वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण मंगळवारी झाले.

यापूर्वीचे मानकरी:-

यापूर्वी शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, आर्किटेक्ट चार्ल्स कुरैय्या, लॅम्बर्ट मस्कारन्हेस, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, लक्ष्मण पै आणि डॉ. प्रेमानंद रामाणी या मान्यवर व्यक्तींना या  पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com