दाबोळी: दुबईहून एअर इंडियाच्या विमानाने दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाकडून सीमा शुल्कच्या गोवा विभागाने 17 लाख 39 हजार रुपयांचे सोने सोमवारी जप्त केले. 432 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा लगादा करून त्याचे तीन कॅप्सुल्स तयार करून ते आपल्या शरीरामध्ये लपविले होते. तथापी तेथे गस्तीवर असलेल्या सीमा शुल्कच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. त्याच्या एकंदर वागणुकीवरून तेथील अधिकाऱ्यांना संशय आल्याने तो तावडीत सापडला.
सीमा शुल्क कायद्याच्या 1962 च्या तरतुदीनुसार हे सोने जप्त करण्यात आले. ही कारवाई सीमा शुल्कच्या सहाय्यक आयुक्त (विमानतळ) ज्युलिएट फर्नांडिस व संयुक्त आयुक्त एम. एस. मीना तसेच आयुक्त मिहिर रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सीमा शुल्क गोवा विभागाने वीस मार्चला सुमारे 33 लाखाचे सोने दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून जप्त केले होते. दोन दिवसांत सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांनी सव्वा किलो सोने जप्त केले. या सोन्याची किंमत सुमारे साडेपन्नास लाख रुपये होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.