वास्को: दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या नसलेल्या मालमत्तेमध्ये बेकादेशीर बांधकामे स्थानिक पंचायतीच्या मान्यतेशिवाय रेल्वेने चालू ठेवलेले काम गोंयचो एकवट संघटनेने आणि कासावली ग्रामस्थांनी बंद पाडले.असे बेकायदेशीर कृत्य ग्रामस्थ खपवून घेणार नाही.असे ग्रामस्थांनी सांगिल्यावर कामगारांनी बांधकाम साहित्य घेऊन काढता पाय घेतला. (Goencho Ekvott association removed illegal constructions )
सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निकालानुसार दक्षिण पश्चिम रेल्वेने दुहेरी ट्रॅकिंगवरील सर्वकाम क्रमाकलाप बंद करणे अत्यावश्यक आहे. कारण आजच्या घडीला 15 च्या आसपास गाड्या सध्याच्या सिंगल ट्रॅकवर कोळशाच्या वाहतुकीसाठी आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील कृष्णपट्टम बंदर वापरण्याची शिफारस केली आहे. जे अदानी समुहाच्या मालकीचे आहे. जेथे रेल्वे पायाभूत सुविधा आधीच तयार आहेत.
गोंयचो एकवटने आरवीएनएलच्या अतिक्रमणाचा निषेध करत आहे. कारण इसोर्सि ते आरोशी पर्यंत विद्यमान सिंगल ट्रकसह खाजगी मालमत्तेवर अतिक्रमण करत आहे. तसेच नारळ, पाम आणि इतर झाडे तोडण्याचा अवलंब करत आहे. अशा प्रकारच्या वृत्तीमुळे अनावश्यक कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. ज्यासाठी अधिकारी स्वत: जबाबदार असतील अशी ताकीद आरवीएनएलच्या अधिका-यांना गोयचो एकवोट संघटनेने दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.