Illegal Fishing In Goa: आम्ही गोव्यात घुसणाऱ्या बोटी पकडायच्या की पोट भरायचं! 'रापोणकार एकवट'चा सरकारला प्रश्न

Goenchea Raponkarancho Ekvott: गोव्यातील पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय गंभीर संकटात सापडला आहे. कर्नाटकहून बेकायदेशीरपणे गोव्याच्या सीमेत शिरणाऱ्या बोटींमुळे स्थानिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होत आहे.
Goenchea Raponkarancho Ekvott (GRE), Goa Illegal Fishing, Karnataka Trawlers In Goa
Goa Illegal FishingCanva
Published on
Updated on

Goa Fishing In Problem Due To Illegal Activities

पणजी: गोव्यातील पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय गंभीर संकटात सापडला आहे. कर्नाटकहून बेकायदेशीरपणे गोव्याच्या सीमेत शिरणाऱ्या बोटींमुळे स्थानिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होत आहे. यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हेच व्यावसायिक मालपे येथे येणाऱ्या बोटींना पकडून मत्स्योद्योग विभागाच्या स्वाधीन करतात. सरकारचे काम आम्ही आमच्या स्वखर्चाने आणि जीवाला धोका पत्करून करत आहोत. आम्ही अशा बेकायदेशीर बोटी पकडाव्यात की आमचा व्यवसाय करावा असा प्रश्न गोवा रापोणकार एकवट संघटनेने सरकारला केला आहे.

गोवा रापोणकार एकवटचे अविनाश शिरोडकर यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी दोन अशाच बेकायदेशीर बोटी पकडून सरकारच्या स्वाधीन केल्या.

मात्र, सरकारकडून याबाबत पुरेशी कारवाई होत नाही. शिरोडकर यांच्या मते, सरकारने या प्रकारच्या बेकायदेशीर मासेमारीवर कडक कारवाई करून पारंपरिक मासेमारी व्यवसायाला संरक्षण देणे आवश्यक आहे.

काँग्रेस प्रदेशध्यक्ष अमित पाटकर यांनीही या मुद्याला पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले की, पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना पुरेशी साधने आणि संरक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Goenchea Raponkarancho Ekvott (GRE), Goa Illegal Fishing, Karnataka Trawlers In Goa
Old Goa: बेकायदेशीर घरे पाहणीला गेल्यावर सापडली दोन जुनी बांधकामे! जुन्या गोव्यातील विचित्र प्रकार; सखोल तपासाची मागणी

रापोणकार एकवटचे मुद्दे

गोव्यातील पारंपरिक मासेमारी व्यवसाय बेकायदेशीर मासेमारीमुळे संकटात.

कर्नाटकहून बेकायदेशीरपणे गोव्यात शिरणाऱ्या बोटींमुळे स्थानिक मासेमारी व्यवसायाला धोका.

सरकारकडून पुरेशी कारवाई नाही.

पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना साधने आणि संरक्षण देण्याची गरज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com