MGP ONOP: 'मगो' वन नेशन वन इलेक्शनच्या समर्थनात, पक्षाध्यक्षांनी घेतली माजी राष्ट्रपतींची भेट

मागील वर्षी वन नेशन, वन इलेक्शन मुद्द्याच्या चौकशीसाठी सरकारने आठ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
MGP ONOP
MGP ONOPDainik Gomantak
Published on
Updated on

MGP ONOP: देशात मागील बऱ्याच काळापासून एक राष्ट्र एक निवडणूक (One Nation One Election) घेण्याची मागणी केली जात आहे. भाजपचे अनेक नेते याच्या समर्थनात असून, आता गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाने वन नेशन वन इलेक्शनचे समर्थन केले आहे.

पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकरांनी आज (दि.27) दिल्लीत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत समर्थनाचे पत्र सादर केले.

मागील वर्षी वन नेशन, वन इलेक्शन मुद्द्याच्या चौकशीसाठी सरकारने आठ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने याबाबत सामान्य नागरिकांकडून सूचना देखील मागवल्या होत्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, 15 व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एनके सिंग आणि इतरांची समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्याची चौकशी करून त्यावर शिफारशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीसमोर आपली सूचना मांडली आहे. वन नेशन वन इलेक्शनसाठी घटनादुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे बीसीआय (बार कौन्सिल ऑफ इंडिया) चे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी म्हटले आहे.

मिश्रा यांनी वन नेशन वन इलेक्शनसाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीकडे तपशीलवार शिफारसी पाठवल्या आहेत. त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com