Lokotsav 2023: गोव्यातील लोकोत्सवात ढिसाळ व्यवस्थापनाचे प्रदर्शन

लोकोत्सवातील ढिसाळ व्यवस्थापनाची हस्तकारागिरांना बरीच झळ पोहोचल्याने ते तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
Goa Lokotsav 2023 | Goa culture
Goa Lokotsav 2023 | Goa cultureDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Lokotsav 2023: ‘लोकोत्सव 2023’ दोन वर्षांनंतर भरविण्यात आला आहे; परंतु यंदा ढिसाळ व्यवस्थापनाची हस्तकारागिरांना बरीच झळ पोहोचल्याने ते तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

विशेषतः बाहेरील राज्यांतून बराच खर्च करून जे हस्तकारागीर आले आहेत त्यांना स्टॉल्सवर पुरेसा वीजपुरवठा, फॅनची व्यवस्था व आवश्यक सुविधा नसल्याने ते नाराज झालेले दिसतात.

कला अकादमीची डागडुजी अद्याप सुरू असल्याने लोकोत्सवात जनरेटरद्वारे वीजपुरवठा होतो. मात्र, वीज खंडित होणे, बऱ्याच स्टॉल्सवर मंद प्रकाश असणे, पॅसेजमध्ये अंधार असा प्रकार आहे. कला अकादमीच्या मुख्य प्रवेशद्वारावरही अंधार असावा, हे शोभत नाही, असेही लोक बोलत होते.

अनेक स्टॉल्स रिकामेच

इथे स्टॉल आरक्षित असल्याने स्थानिकांनाही स्टॉल नाकारलेत; पण प्रत्यक्षात अनेक स्टॉल्स रिकामेच आहेत. राजस्थान, गुजरात, मुंबई आदी ठिकाणाहून लोकोत्सवात किमान दोनशे स्टॉल्स असायचे. यंदा केवळ साठच्या आसपास आहेत. स्टॉलवर मंद प्रकाश असल्याने वस्तूंचा प्रभाव पडत नाही. खरे तर स्टॉल्सच्या भाड्यातही समानता हवी.

Goa Lokotsav 2023 | Goa culture
Vijay Sardesai : 'अर्थसंकल्पाने गोव्याला लोटले आर्थिक संकटात'

अजून ओळखपत्र नाहीत

महाराष्ट्रातील ए. खुपसे यांनी सांगितले की, यापूर्वी स्टॉल हस्तांतर व ओळखपत्र हे उद्‌घाटन व्हायच्या आधी दिले जायचे व भाडे घेऊन पावती दिली जायची; पण हे सोपस्कार अजून पूर्ण व्हायचे आहेत. जीएसटीचे पथकही येऊन माहिती घेऊन गेले;

पण आयोजन खात्याची माणसे आलेली नाहीत. काय अडचणी आहेत त्याची विचारपूस पण केली नाही.

कुणीही दखल घेत नाही

हरियाणा येथील कारागीर गौरव जाटव यांनी सांगितले की, आम्ही खर्च करून एवढ्या लांब आलोय; परंतु स्टॉलचे भाडे आणि खर्च तरी सुटायला हवा.

उद्‌घाटनावेळी भाषणात हस्तकारागिरांविषयी ममत्व दाखविणारे मंत्री प्रत्यक्षात आमची दखल घेत नाहीत. आम्हाला शेड मिळाली नाही, अंधारात स्टॉल मांडलाय. मी तीन वेळा लोकोत्सवात आलोय, पण यंदाचा अनुभव अत्यंत वाईट आहे. पुन्हा यायची इच्छा नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com