Mauvin Godinho : गोव्याच्या औद्योगिक धोरणात ‘एकखिडकी’ पद्धत अवलंबणार

गुंतवणूकदारांना गोव्यात खासगी जमीन खरेदी करून उद्योग करण्याची मुभा असेल, अशी माहिती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
Mauvin Godinho | App based Taxi in Goa
Mauvin Godinho | App based Taxi in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Mauvin Godinho : सरकारने नवीन औद्योगिक धोरण अधिसूचित करून पर्यावरणपूरक उद्योग सुरू करण्यासाठी सर्व परवान्यांसाठी एकखिडकी पद्धत अवलंबली आहे. त्यात गुंतवणूकदारांना गोव्यात खासगी जमीन खरेदी करून उद्योग करण्याची मुभा असेल, अशी माहिती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. जीसीसीआयच्या सभागृहातील पत्रकार परिषदेत मंत्री माविन गुदिन्हो बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राल्फ डिसोझा, मांगिरिष पै रायकर आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माविन म्हणाले की, पणजीतील ‘इन्वेस्ट गोवा-22’ या परिषदेत सुमारे 20 गुंतवणूकदारांना परवानगी पत्र (लेटर ऑफ इंटेंट) दिले जाणार आहे. त्यामध्ये तीन विदेशी उद्योगांचा समावेश आहे. त्यातून सुमारे 15 हजार लोकांना रोजगार तसेच सुमारे 5 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

मोपा विमानतळ लवकरच सुरू होणार असून गोवा हे लॉजिस्टिक्स हब बनणार आहे. केंद्र सरकार लॉजिस्टिक्स क्षेत्राला प्राधान्य देत आहे. त्यामुळे मोपा विमानतळाचा पुरेपूर फायदा राज्याला होणार आहे. या कनेक्टीव्हीटीमुळे उद्योगांनाही मदत होणार आहे.

...तर बेरोजगारी संपुष्टात

जगात फार्मास्युटिकल्स क्षेत्रामधील 15 टक्के औषधे गोव्यात उत्पादित होतात. याशिवाय ‘नासा’साठी लागणारे अत्याधुनिक सुटे भागही गोव्यातच तयार केले जातात. या उद्योगांना लागणाऱ्या कामगार वर्गाला प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी आहे. मोपा विमानतळासाठी लागणारा गोव्यातील कर्मचारी वर्ग त्या कंपनीनेच प्रशिक्षित करून सेवेत घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, असे गुदिन्हो म्हणाले.

Mauvin Godinho | App based Taxi in Goa
Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्ष निवड प्रक्रियेला गोवा फॉरवर्ड देणार न्यायालयात आव्हान

खासगी जमिनीचा वापर

औद्योगिक धोरणामध्ये पर्यावरणपूरक उद्योगांना गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. या उद्योगांमध्ये राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. नव्या धोरणात खासगी जमिनीतही उद्योगांसाठी परवानगी दिली जाईल, अशी माहिती मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com