Shigmotsav in Goa: शनिवारपासून गोव्यात घुमणार 'घुमचे कटर घूम', वाचा संपूर्ण वेळापत्रक

Shigmotsav Complete Schedule 2025: फोंडा येथे १५ मार्चपासून या शिगमोत्सवाला सुरुवात होणार आहे.
Goa Shigmotsav 2025
Goa Shigmotsav 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचा बहुप्रतिक्षित असा वसंतोत्सवातील शिमगोत्सव हा संस्कृती, परंपरा आणि उत्सवाच्या नत्रेदीपक प्रदर्शनासह राज्यात उत्साही वातावरण पसरविण्यास सज्ज आहे. १५ ते २९ मार्च या कालावधीत हा उत्सव सुरू होताच विविध शहरांमध्ये गोव्याचा समृद्ध वारसा दर्शविणारे चित्ररथ, पारंपरिक लोकनत्यृ आणि भव्य मिरवणुका पाहायला मिळतील.

शिमगोत्सवाचे वेळापत्रक (Shigmotsav Timetable)

फोंडा येथे १५ मार्चपासून या उत्सवाला सुरुवात होईल. १६ मार्च रोजी मडगाव, १७ मार्च केपे, १८ मार्चला कुडचडे, १९ मार्च शिरोडा, २० मार्च कळंगुट आणि डिचोली, २१ मार्च रोजी वास्को, २२ मार्च रोजी पणजी येथे शिमगोत्सव मिरवणूक होईल.

म्हापसा आणि सांगे येथील रस्ते २३ मार्च रोजी शिमगोत्सव मिरवणुकीने फुलतील, तर २४ मार्च रोजी काणकोण आणि कुंकळळी येथे भव्य मिरवणूक पहायला मिळेल.

२५ मार्च रोजी पेडणे, २६ रोजी धारबांदोडा, २७ वाळपई, २८ रोजी साखळी आणि शेवटी २९ मार्च रोजी मांद्रे येथे मिरवणुकीची सांगता होईल. उत्सवाच्या प्रत्येक दिवशी, विविध ठिकाणांवर भव्य परेड होईल.

Goa Shigmotsav 2025
Goa Budget Session 2025: तीन दिवसांचे अधिवेशन! विरोधी पक्षाच्या आमदारांना मुद्दे मांडण्याची मुभा द्या; LOP आलेमाव

शिमगो हा एक असा उत्सव आहे, ज्यात गोव्याचे सांस्कृतिक सार लोककला, संगीत आणि आकर्षक चित्ररथ भव्य मिरवणुकीत सादर केले जातात. राज्याच्या सौंदर्याचा शोध घेताना, अभ्यागतांसाठी अस्सल गोव्याच्या परंपरेमध्ये एकरूप होण्याची ही एक संधी आहे. आम्ही पर्यटकांना या अनोख्या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो. पर्यटकांनी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे असलेल्या या विविध पैलूंचा आस्वाद घ्यावा.

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री.

Goa Shigmotsav 2025
No Smoking Day 2025: स्ट्रोक, ह्रदयरोग, एजिंग वाढवणारे स्मोकिंग सोडण्यासाठी आयुर्वेदात आहे रामबाण उपाय, वाचा

शिगमो हा केवळ एक उत्सव नसून तो गोव्याची विविधरंगी परंपरा आणि समुदायाच्या भावनेचे प्रतिबिंब आहे. दरवर्षी हा उत्सव कलाकार, सादरकर्ते आणि अभ्यागतांना एकत्र आणून गोव्याचा समृद्ध वारसा साजरा करतो. हा भव्य देखावा अनुभवण्यासाठी आणि गोव्याच्या सर्वांत रंगीबेरंगी आणि आनंदी स्वरूपाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सर्वांचे स्वागत करतो.

- केदार नाईक, पर्यटन संचालक

अभ्यागतांना गोव्यातील उत्सवांचे सार अनोख्या पद्धतीने अनुभवण्याची संधी मिळेल. ढोल-ताशे यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालापासून परंपरागत वेशभूषेतील लोककलाकारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणापर्यंत शिमग्याचा प्रत्येक क्षण पाहण्यासारखा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com