NEET चा सावळा गोंधळ, गोव्यातील 3,200 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर

NEET Goa: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील या पाच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थी परीक्षा देत असतात.
NEET UG
NEET UG Dainik Gomantak

NEET Goa

NEET परीक्षेच्या सुरु असलेल्या सावळ्या गोंधळावरुन गोव्यातील 3,200 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर लागले आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीकडून याबाबत काय सूचना येतात याकडे सध्या राज्यातील विद्यार्थी आणि प्रवेश परीक्षा अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. नीट परीक्षेसाठी राज्यातून 3,200 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.

गोव्यात वैद्यकीय, दंत चिकित्सा, होमिओपॅथी, आयुर्वेद, नर्सिंग या पाच अभ्यासक्रमासाठी नीट प्रवेश परीक्षेचे गुण विचारात घेतले जातात. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील या पाच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थी परीक्षा देत असतात.

यावर्षी 800 जागांसाठी 3,200 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. राष्ट्रीय स्तरावर 1,600 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्यानंतर वाद निर्माण झाल्या, या ग्रेम मार्कांचा पुनर्विचार केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क माघारी घेतल्यास त्यांच्या रँकमध्ये देखील बदल होणार आहे.

हा बदल झाल्यास विद्यार्थ्यांच्या रँकमध्ये मोठा बदल होईल. एनटीए अंतिम यादी जाहीर करत नाही तोवर गोव्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी निश्चित करता येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

NEET UG
Goa Hit And Run Case: चालत घरी जाताना भरधाव ट्रकने चिरडले, फरार चालकाला अटक

तंत्रशिक्षण संचलनालयाने सुरुवातील १२ जूनपर्यंत नीट परीक्षेचा निकालपत्र जमा करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गुणपत्रिका मिळण्याची शक्यता राज्यातील प्रवेश परीक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गोव्यासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होईल, असे अधिकारी म्हणाले.

दरम्यान, जेईई गुणांच्या आधारावर तंत्रशिक्षण संचलनालयाने अभियांत्रिकीसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. गुरूवारपासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गोव्याने राज्य प्रवेश परीक्षा रद्द केल्याने अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई आणि वैद्यकीय श्रेत्राशी संबधित विविध अभ्यासक्रमासाठी जेईई किंवा नीटचे गुण विचारात घेतले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com