Digital Arrest: सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट स्कॅम! गोमंतकीय नागरिकाला 1.05 कोटींचा गंडा; केरळमधून एकाला अटक

Digital Arrest Scam Goa: गोव्यातील एका नागरिकाची 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 1.05 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला गोवा पोलिसांनी अटक केली आहे.
Goa Cyber Fraud
Goa Cyber FraudDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cyber Fraud: गोव्यातील एका नागरिकाची 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 1.05 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला गोवा पोलिसांनी अटक केली. केरळमधून या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या अटकेमुळे अनेक राज्यांमधील सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, 9 जुलै 2025 रोजी दक्षिण गोव्यातील (South Goa) केपे येथील एका रहिवाशाने गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हेगार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपींनी व्हॉट्सॲपवर पोलिस किंवा कायदेशीर अधिकाऱ्यांचे सोंग घेऊन तक्रारदाराला एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संशयित असल्याचे सांगितले. आरोपींनी तक्रारदाराला एक बनावट अटक वॉरंट दाखवले आणि भीती दाखवून त्याला अनेक बँक खात्यांमध्ये 1.05 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

Goa Cyber Fraud
Goa Cyber Fraud: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश: गोमंतकीयाकडून उकळले 2.63 कोटी; गुजरातमधील आरोपी गजाआड

पोलिसांची कारवाई

दुसरीकडे, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आयटी ॲक्टच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक (PSI) मनीष दाबाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरु केला. आर्थिक विश्लेषणाच्या आधारावर पोलिसांनी आरोपीचा शोध केरळमधील कन्नूर येथे घेतला आणि 7 ऑगस्ट रोजी त्याला अटक केली.

Goa Cyber Fraud
Goa Cyber Fraud: गोमंतकीयाला 38 लाखांना टोपी! शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवून देण्याचं आमिष, महाराष्ट्रातील एकजण अटकेत

आरोपीचे नाव गोकुळ प्रकाश एम. के. असे असून त्याच्या आयसीआयसीआय (ICICI) बँक खात्यात फसवणुकीच्या रकमेपैकी 24 लाख रुपये जमा झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, आरोपीचे हे बँक (Bank) खाते 10 राज्यांतील 13 फौजदारी प्रकरणांशी जोडलेले आहे, ज्यात एकूण 9.02 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले असून पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. या अटकेमुळे सायबर फसवणुकीचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com