goans safe who went to Amarnath Yatra
goans safe who went to Amarnath Yatra Dainik Gomantak

अमरनाथ यात्रेसाठी गेलेले गोमंतकीय सुखरूप

देवदर्शनानंतर मथुरेकडे रवाना : ढगफुटी आणि भूस्खलनामुळे वाढली होती चिंता
Published on

मडगाव : शुक्रवारी संध्याकाळी जम्मू काश्मीरस्थित बाबा अमरनाथ गुंफेजवळ झालेल्या ढगफुटीच्या दुर्घटनेत काही भाविक दगावले असून अनेकजण भूस्खलनामुळे बेपत्ता झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गोव्यातून या यात्रेसाठी गेलेला 22 भाविकांचा गट सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

goans safe who went to Amarnath Yatra
रस्‍ता कामाची चौकशी करा : ट्रोजन डिमेलो

या गटाने आज शनिवारी मथुरेकडे प्रस्थान केल्याचे सांगण्यात आले. दरवर्षीप्रमाणेच यंदाही कुडचडेतील नाथ संप्रदायाच्या झेंड्याखाली दीपक मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली 22 भाविकांचा गट अमरनाथ यात्रेसाठी गेला आहे.

या गटातील विजय नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील भाविकांच्या गटाने गुंफेतील हिमलिंगाचे दर्शन घेऊन सुरक्षितरित्या पुढील यात्रेसाठी प्रस्थान केले आहे. या गटातील भाविकांनी व्यवस्थित देवदर्शन केले आणि ते सर्वजण माघारी फिरले. त्यानंतर ही दुर्घटना झाल्याचे नाईक यांनी सांगितले.

यापूर्वीही बचावले होते गोव्याचे भाविक

  • हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा कमांडर बुऱ्हान वाणी याचा लष्कराने 8 जुलै 2016 रोजी खात्मा केला होता.

  • त्यानंतर एक वर्षाने गोमंतकीय भाविकांचा गट काश्‍मीरला बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी गेला होता.

  • त्यावेळी वाणी याच्या निधनाला वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमध्ये तणाव निर्माण झाला होता.

  • मात्र, त्यावेळीही गोमंतकीय भाविकांच्या गटाने सर्व अडथळ्यांवर मात करत यात्रा यशस्वी केली होती. त्या प्रसंगाची आता आठवण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com