खऱ्या अर्थाने ‘गोंयकारपण’! समुद्रात जहाजाच्या नांगराला लागलेल्या मातीपासून साकारली 'गणरायाची मूर्ती'

Ganesh Chaturthi 2024: खोल महासागरात गोवावासीयांनी ‘एमव्ही हार्मोनियस’ या जहाजावर गणेश चतुर्थी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली
Ganesh Chaturthi 2024: खोल महासागरात गोवावासीयांनी ‘एमव्ही हार्मोनियस’ या  जहाजावर गणेश चतुर्थी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली
Chavath 2024|Ganeshotsav 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi Special Story

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो, ‘गोंयकार’ आपली आवडीची ‘चवथ’ मनोभावे साजरी करतातच. भलेही तो, भर समुद्रात जहाजावर काम करत असला तरीही. याचेच एक उदाहरण म्हणजे खोल महासागरात धार्मिक सीमा ओलांडलेल्या गोवावासीयांनी ‘एमव्ही हार्मोनियस’ या जहाजावर गणेश चतुर्थी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली.

गोमंतकीयांनी खलाशी क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे आणि त्यांच्या समर्पित व्यावसायिकतेने, मेहनतीने संपूर्ण जगात गोवा आणि भारताची शान वाढविली आहे. ते त्यामुळे एका अर्थाने जागतिक नागरिक बनले आहेत.

पण त्यांचा मनातील आवडता गणपती त्यांच्या मनात घर करून आहेच. सणासुदीच्या काळात घरापासून दूर असूनही आपली निजाची संस्कृती हृदयाशी जपून ठेवण्याच्या त्यांच्या उत्साहाला बाधा येत नाही.

इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर बिपीन गावकर यांनी नांगर साखळीतून मातीचा गणपती बनवून गणेशोत्सव साजरा केला. भर समुद्रात गणेशाची मूर्ती आणणार कुठून, हा प्रश्‍‍नही त्यांच्या उमेदीच्या आड आला नाही. त्यांच्या कामी आली ती जहाजाच्या नांगराला चिकटून राहिलेली माती.

जहाजाचे मुख्य अभियंते संदीप श्रीकांत बोरकर, मुख्याधिकारी जोनास हन्‍सेल आणि इलेक्ट्रॉ टेक्निकल अधिकारी बिपीन गावकर या तिघांनी एकत्र येऊन नांगराला लागलेल्या मातीपासून सुबक अशी गणपतीची छोटीशी मूर्ती बनवली.

बाकीच्यांनी सजावट केली. गणेश चतुर्थीदिवशी या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजाही केली. या उत्‍सवात सर्वधर्मीय गोमंतकीय सामील झाले होते.

Ganesh Chaturthi 2024: खोल महासागरात गोवावासीयांनी ‘एमव्ही हार्मोनियस’ या  जहाजावर गणेश चतुर्थी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली
Ganesh Chaturthi 2024: पोर्तुगिजांच्या नजरेस पडू नये म्हणून गोव्यात कागदावर रेखाटले जायचे गणपतीचे चित्र

कॅ. इलियास यांनी बनविल्‍या करंज्‍या

अशी दुसरी ‘चवथ’ कॅप्टन इलियास यांच्या नेतृत्वाखाली समुद्रातील कार्गो जहाजावर साजरी करण्यात आली. यासाठी स्वतः कॅ. इलियास यांनी वेळात वेळ काढून करंज्या आणि इतर फराळ बनविला. या उत्सवातही सर्वधर्मीय गोमंतकीय सामील झाले होते. त्यामुळे तो धार्मिक सौहार्द आणि सर्वधर्मीय सहिष्णुता दाखविणारा ठरला, ज्यातून खऱ्या अर्थाने ‘गोंयकारपण’ दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com