गुगल मॅपचा 'लोचा' अन् गोमंतकीय महिलेचा 'दिलासा'; रात्री भरकटलेल्या विदेशी पर्यटक महिलेसाठी 'सिंधू' ठरली देवदूत Watch Video

Sindhu Kumari Goan woman: तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेकदा मोबाईलमधील 'नॅव्हिगेशन'वर अवलंबून असतो, मात्र हेच तंत्रज्ञान जेव्हा दगा देते, तेव्हा माणसाला माणुसकीचीच ओढ लागते.
Goan woman helps foreign tourist at night
Goan woman helps foreign tourist at nightDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेकदा मोबाईलमधील 'नॅव्हिगेशन'वर अवलंबून असतो, मात्र हेच तंत्रज्ञान जेव्हा दगा देते, तेव्हा माणसाला माणुसकीचीच ओढ लागते. दक्षिण गोव्यातील निर्जन रस्त्यांवर रात्री १० वाजता एका विदेशी महिला पर्यटकेसोबत असाच काहीसा प्रकार घडल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गुगल मॅपने रस्ता चुकवल्यामुळे घाबरलेल्या या पर्यटक महिलेसाठी सिंधू कुमारी ही गोमंतकीय महिला 'देवदूत' बनून धावून आली.

रात्रीचा थरार

मिळालेली माहिती अशी की, एक विदेशी पर्यटक महिला दक्षिण गोव्यातील आपल्या हॉटेलकडे पायी परत जाण्याचा प्रयत्न करत होती. तिने गुगल मॅपचा आधार घेतला होता, परंतु ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे (Glitch) मॅपने तिला मुख्य रस्त्याऐवजी एका अंधाऱ्या आणि निर्जन ठिकाणी नेऊन सोडले. रात्रीचे १० वाजले होते, आजूबाजूला कोणीही नव्हते आणि रस्ता सापडत नसल्याने ही पर्यटक महिला प्रचंड घाबरली होती.

सिंधू कुमारी ठरली 'देवदूत'

त्याचवेळी सिंधू कुमारी ही गोव्याची महिला तिथून जात होती. रस्त्यावर एकटी विदेशी महिला रडताना पाहून सिंधूने आपली दुचाकी थांबवली. सिंधूने केवळ तिला धीरच दिला नाही, तर तिला आपल्या गाडीवर बसवून सुरक्षितपणे 'हॉटेल कोकोनट ग्रोव्ह बीच रिसॉर्ट' येथे पोहोचवले.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मदतीसाठी सिंधूने एक रुपयाही घेण्यास नकार दिला. "हे माझे कर्तव्य होते, मला पैसे नकोत," असे म्हणत तिने त्या पर्यटकेला आपला इंस्टाग्राम आयडी दिला, जेणेकरून भविष्यात काही अडचण आल्यास ती संपर्क साधू शकेल.

सिंधूचं होतंय कौतुक

या घटनेचा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी सिंधू कुमारीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. "जेव्हा ॲप्स निकामी ठरतात, तेव्हा माणुसकी उभी राहते," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "सिंधूने केवळ लिफ्ट दिली नाही, तर भारताची सुरक्षित आणि सन्माननीय प्रतिमा जगासमोर मांडली आहे." महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सिंधूने दाखवलेले हे धाडस आणि माणुसकी खरोखरच कौतुकास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com