गोव्यातला अमन राऊत देसाई बनला देशातील सर्वात तरुण राष्ट्रीय श्रेणी-II पंच

या राष्ट्रीय परीक्षेत एकूण 60 उमेदवारांंनी सहभाग घेतला होता. यामध्ये निवड झालेल्या 27 जणांमध्ये अमनचीही नियुक्ती झाली आहे.
Aman Raut Desai
Aman Raut DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Goan Student Aman Raut Dessai becomes Youngest Grade II Umpires in India

गोव्यातला तरुण अमन राऊत देसाई हा भारतातील सर्वात तरुण राष्ट्रीय श्रेणी-II पंच बनला आहे. याबाबाबतची माहिती गोवा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे अभिमानाने जाहीर करण्यात आली आहे.

अमनने भारतीय बॅडमिंटन असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पंचांची परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली.

Aman Raut Desai
National Games: राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमुळे गोव्यातील मासेमारी-जलक्रीडा राहणार बंद?

या राष्ट्रीय परीक्षेत एकूण 60 उमेदवारांंनी सहभाग घेतला होता. यामध्ये निवड झालेल्या 27 जणांमध्ये अमनचीही नियुक्ती झाली आहे. अमन हा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स केपेचा विद्यार्थी असून आता त्याची राष्ट्रीय श्रेणी-II पंच म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

हे त्याच्या कौशल्याचा, ज्ञानाचा आणि अंपायरिंगच्या आवडीचेच फळ आहे. अमनने याआधी ज्युनियर (U19) राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 2017 मध्ये राज्य पंच परीक्षा देखील पूर्ण केली आहे. तेव्हापासून, तो गेल्या तीन वर्षांत झालेल्या विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि चॅम्पियनशिपमधील सर्वात तरुण पंच ठरला आहे.

जयपूर, राजस्थान येथे राष्ट्रीय पंचांच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आणि अमनच्या यशाने त्याचे कॉलेज, कुटुंब, गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि गोवेकरांना अतिशय आनंद आणि अभिमान वाटला. तो फक्त गोव्यातीलच नव्हे तर देशातील तरुणांसाठी प्रेरणा आहे.

गोवा बॅडमिंटन असोसिएशनने अमन राऊत देसाईचे त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com