Garbage Collection Center : शाळा इमारतीजवळ कचरा संकलन केंद्र; विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका

Garbage Collection Center : कोणतीही पूर्वकल्पना न देता हे वर्ग त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्याने मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
Garbage Collection Center
Garbage Collection CenterDainik Gomantak

Garbage Collection Center

पणजी, पर्वरी येथील नाना-नानी पार्कजवळ विद्या प्रबोधिनी हायस्कूलची नवी इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीच्या शेजारी कचरा संकलन केंद्र असल्याने उग्र दर्प येतो. या इमारतीमध्ये शिशुवर्ग (नर्सरी) ते चौथीपर्यंतचे वर्ग स्थलांतर करण्यात आले आहेत.

कोणतीही पूर्वकल्पना न देता हे वर्ग त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्याने मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ही मुले ४ ते ९ वयोगटातील असल्याने त्यांना या घाणीमुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातचे पत्र मुलांच्या पालकांनी सहीनिशी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासह मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पाठवले आहे. या स्थलांतराला विरोध करण्यासाठी उद्या १४ जूनला दुपारी १२ वाजता पर्वरी येथील नाना-नानी पार्कमध्ये पालक एकत्र जमणार आहेत.

Garbage Collection Center
Goa Crime News: फोंड्यात क्रेनने मोटारसायकल पायलटला चिरडले; चालक अटकेत; गरीब कुटुंबाने गमावला आधारस्‍तंभ

या मुलांचे वर्ग स्थलांतर करण्यापूर्वी पालक-शिक्षक संघटनेची बैठकही घेण्यात आली नाही. शाळा सुरू झाल्याने या इमारतीमध्ये मुलांना घेऊन पालक गेले मात्र इमारतीच्या बाजूला कचऱ्याचे ढीग पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. यासंदर्भात व्यवस्थापनाला जाब विचारला तरी काहीच उत्तर देण्यात आले नाही. व्यवस्थापन या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com