Bits Pilani Goa: ‘बिट्स पिलानी’कडून प्रतापराव पवार सन्मानित

देदीप्‍यमान कार्य : राज्‍यपालांच्‍या हस्‍ते सन्‍मान
Prataprao Pawar
Prataprao PawarDainik Gomantak
Published on
Updated on

Bits Pilani Goa पद्मश्री तथा सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री प्रतापराव पवार यांना झुआरीनगर येथील ‘बिट्स पिलानी’च्‍या दीक्षांत समारंभात आज पश्चिम बंगालचे राज्‍यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांच्या हस्ते गौरवण्‍यात आले.

सामाजिक तसेच उद्योग जगतामधील देदीप्‍यमान कामगिरी आणि भरीव योगदानाची दखल घेऊन ‘कॉर्पोरेट लीडरशिप श्रेणी’अंतर्गत प्रतिष्ठित माजी विद्यार्थी व स्‍नातक या नात्‍याने सन्‍मान करण्‍यात आला.

रविवारी बिट्स पिलानी झुआरीनगर कॅम्पसमध्ये २०२२-२३ विद्यार्थी बॅचचा दीक्षांत सोहळा दिमाखात झाला.

याप्रसंगी ६ अतिमहनीय व्‍यक्‍तिमत्त्‍वांचा गौरव करण्‍यात आला. प्रमुख अतिथी डॉ. संघमित्रा बंडोपाध्याय, बिट्स पिलानीचे कुलगुरू प्रो. व्ही. रामगोपाल राव, बिट्स पिलानीचे संचालक प्रो. सुमन कुंडू व इतर मान्यवर उपस्‍थित होते.

पद्मश्री पवार यांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावरील आयोजकांनी त्‍यांच्‍या कार्याचा समग्र आढावा घेतला. बिट्स पिलानीचे माजी विद्यार्थी व स्‍नातक म्‍हणून आम्‍हाला अभिमान आहे, असेही उद्गार मान्‍यवरांनी काढले.

Prataprao Pawar
Panjim Smart City बनण्यास अजून वर्षभर प्रतिक्षा, आत्तापर्यंत केवळ 33 टक्के काम पूर्ण; कामे रखडण्याची कारणं आली समोर

प्रा. मिलिंद तांबे सन्‍मानित

प्रा. मिलिंद तांबे यांना त्यांच्या सामाजिक अतुलनीय योगदानाची दखल घेऊन शैक्षणिक आणि संशोधन या श्रेणीतील प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. भरीव कर्तृत्वाद्वारे प्रा. मिलिंद तांबे यांनी बिट्स पिलानी संस्थेचे नाव उज्‍ज्‍वल केले आहे.

तांबे यांनी १९८६ मध्ये बिट्स पिलानीमधून संगणक शास्त्रात एम. एस्सी. (टेक) आणि त्यानंतर १९९१ मध्ये कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली. ते सध्या संगणक विज्ञान विषयाचे जॉर्डन मॅके येथे प्रोफेसर आहेत.

आणि सेंटर फॉर रिसर्च इन कॉम्प्युटेशन अँड सोसायटी (सीआरसीएस), हार्वर्ड विद्यापीठाचे संचालक आहेत. त्यांनी ९५७८ संदर्भासह ४४४ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

Prataprao Pawar
Panjim Smart City बनण्यास अजून वर्षभर प्रतिक्षा, आत्तापर्यंत केवळ 33 टक्के काम पूर्ण; कामे रखडण्याची कारणं आली समोर

कार्याचा आढावा

३ जानेवारी २००७ मध्ये वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्सच्या (डब्लूएएन) संचालक मंडळावर त्‍यांची नियुक्ती झाली होती. जून २००७ मध्ये त्यांना संचालक मंडळाचे उपाध्यक्ष बनवण्यात आले.

चाळीस वर्षे ते अजय मेनाकेम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष होते आणि ‘भारत फोर्ज लिमिटेड’सारख्या विविध भारतीय सूचीबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावरही संचालक होते.

भरीव योगदान

प्रतापराव पवार हे अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे विश्वस्त आहेत आणि या संस्था नागरी विकासात सक्रिय सहभाग घेतात.

पद्मश्री प्रदान

व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील सेवेबद्दल प्रतापराव पवार यांना २०१४ मध्ये भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ नागरी पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com