

डिचोली: डिचोली तालुक्यातील चारही जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये मिळून एकूण ६२ हजार ९० मतदार आहेत. त्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. पुरुष मतदार ३० हजार ३६७ तर महिला मतदार ३१ हजार ७२३ आहेत. यावरून आगामी झेडपी निवडणुकीत महिलांचे मत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होते.
लाटंबार्से जिल्हा पंचायत मतदारसंघात लाटंबार्से, साळ, मेणकुरे, अडवलपाल आणि मुळगाव या पंचायती आहेत. तेथे ७६०५ पुरुष व ७७४७ महिला मिळून १५,३५२ मतदार नोंदले गेले आहेत. मये जिल्हा पंचायत मतदारसंघात मये-वायंगिणी, शिरगाव, चोडण-माडेल आणि नार्वे पंचायतींचा समावेश आहे. या मतदारसंघात ७७२२ पुरुष व ८१३१ महिला मिळून १५,८५३ मतदार आहेत.
पाळी जिल्हा पंचायत मतदारसंघात आमोणे, न्हावेली, सुर्ल, वेळगे आणि पाळी-कोठंबी या पंचायतींचा समावेश आहे. तेथे ७१२८ पुरुष व ७४९३ महिला मिळून १४,६२१ मतदार आहेत. चारही मतदारसंघांतील आकडेवारीवरून महिला मतदारांचा वरचष्मा दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कारापूर-सर्वणमध्ये सर्वाधिक मतदार
तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी कारापूर-सर्वण मतदारसंघात सर्वाधिक तर पाळी मतदारसंघात सर्वांत कमी मतदार आहेत. कारापूर-सर्वण जिल्हा पंचायत मतदारसंघात कारापूर-सर्वण, कुडणे, पिळगाव आणि वन-म्हावळिंगे या चार पंचायतींचा समावेश असून, तेथे ७९१२ पुरुष व ८३५२ महिला मिळून १६,२६४ मतदार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.