Goa ZP Election Result 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा, विरोधकांनं केलं चारी मुंड्या चीत; वाचा दिवसभरातील घडामोडी

North And South Goa ZP Election 2025 Result Live Update In Marathi: उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागांचा निकाल आज (२२ डिसेंबर) जाहीर होणार आहे.
Pramod Sawant
Pramod SawantPramod Sawant X Handle
Published on
Updated on

धारगळ जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपचे उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर विजयी

धारगळ जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपचे उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर विजयी झाले

वेलिंग-प्रियोळ जिल्हा पंचायतीच्या जागेवर एमजीपीच्या आदिती गावडे विजयी

वेलिंग-प्रियोळ जिल्हा पंचायतीच्या जागेवर एमजीपीच्या आदिती गावडे विजयी झाल्या.

पैंगिण जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपचे अजित लोलयेकर विजयी

पैंगिण जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपचे अजित लोलयेकर विजयी

पाळी जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपचे सुंदर नाईक विजयी

पाळी जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपचे सुंदर नाईक विजयी झाले.

पेन्हा दि फ्रँका जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपचे संदीप साळगावकर विजयी

पेन्हा द फ्रँका जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपचे संदीप साळगावकर विजयी झाले.

वेळ्ळी जिल्हा पंचायतीच्या जागेवर काँग्रेसचे ज्युलिओ फर्नांडिस विजयी

वेळ्ळी जिल्हा पंचायतीच्या जागेवर काँग्रेसचे ज्युलिओ फर्नांडिस विजयी झाले.

शिरोड जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपच्या गौरी शिरोडकर 3115 मतांनी विजयी

शिरोड येथील भाजप उमेदवार गौरी सुभाष शिरोडकर 3115 मतांनी विजयी झाल्या.

चिंबल जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपच्या गौरी कामत विजयी

चिंबल जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपच्या उमेदवार गौरी कामत विजयी झाल्या.

कुर्टी जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपचे प्रितेश गावकर विजयी

कुर्टी जिल्हा पंचायतीच्या जागेवर भाजपचे उमेदवार प्रितेश गावकर विजयी झाले.

हळदोणमध्ये काँग्रेसचा विजयी झेंडा! मेरी उर्फ मारिया मिनेझिस यांचा दणदणीत विजय

हळदोण पंचायतीवर काँग्रेसच्या मेरी उर्फ मारिया मिनेझिस यांचा दणदणीत विजय

कोलवातून 'आप' उमेदवार अंतानियो फर्नांडिस 73 मतांनी विजयी

आप उमेदवार अंतानियो फर्नांडिस यांनी कोलवा मतदारसंघातून 73 मतांनी विजयी झाले.

मोरजीतून 'मगो'च्या तारा हडफडकर 3486 मताधिक्याने विजयी

मोरजी मतदार संघातील उमेदवार तारा हडफडकर 3486 मतांच्या आघाडीने विजयी झाल्या.

नावेलीतून काँग्रेसच्या मलिफा कार्दोझो 1851 मतांनी विजयी

नावेलीत पहिल्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार मलिफा कार्डोझो 1305 मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीतील या निर्णायक आघाडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरु केला होता. मात्र अखेर मलिफा कार्दोझो या 1851 मतांनी विजयी झाल्या.

धारबांदोडामध्ये भाजप, कुठ्ठाळीत अपक्ष उमेदवारांची बाजी

धारबांदोडा मतदारसंघात भाजप उमेदवार रुपेश देसाई यांचा विजय झाला असून, कुठ्ठाळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मेरिसियाना वाझ यांचा विजय झाला आहे.

दक्षिणेत आणखी एका काँग्रेस उमेदवाराची बाजी; नुवेत ब्रागांझा यांचा 440 मतांनी विजय

दक्षिण गोव्यात आणखी एका काँग्रेस उमेदवाराने बाजी मारली आहे. नुवेत अँटनी ब्रागांझा यांचा ४४० मतांनी विजय झाला आहे.

भाजप 10, काँग्रेस 3, मगो 01, गोवा फॉरवर्ड 01, आरजी 01 आणि अपक्ष 01; दुपारी एकपर्यंतचा निकाल

गोवा जिल्हा पंचायत दुपारी एकपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. यात भाजप १० जागांवर, मगो ०१, गोवा फॉरवर्ड ०१, काँग्रेस ०३, आरजी ०१ आणि अपक्ष ०१ जागेवर विजयी झाले आहे.

फेर मतमोजणीतून देखील भाजपच्या पदरी निराशा; दवर्लीत काँग्रेस उमेदवारच विजयी

दवर्लीत काँग्रेस उमेदवार फ्लोरियानो फर्नांडिस ४६१ मतांनी विजयी झाल्यानंतर भाजप उमेदवार सत्यविजय नाईक यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. फेर मतमोजणीनंतर देखील काँग्रेस उमेदवारच विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

कवळे मतदारसंघ! मगोचे उमेदवार गणपत नाईक 5058 मतांनी विजयी

गणपत नाईक ( मगोप )- 9387 मते,

विश्वेश नाईक ( आरजीपी ) 4300 मते, एकूण बाद मते - 270

गणपत नाईक 5058 मतांच्या विजयी

मनोज परब यांच्या पक्षाने खातं उघडलं; सांताक्रूझमधून आरजीचा उमेदवार विजयी

मनोज परब यांचा पक्ष रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षानं खातं उघडलं असून, सांताक्रूझमधून इस्पेरांका ब्रागांझा विजयी झाले आहेत.

हरमल मतदारसंघ! अपक्ष उमेदवार राधिका पालयेकर 56 मतांनी विजयी

हरमल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राधिका पालेकर 56 मतांनी विजयी झाल्या.

शिवोलीत भाजपचे उमेदवार महेश्वर गोवेकर विजयी

भाजपचे महेश्वर गोवेकर यांनी शिवोली जिल्हा पंचायत जागा जिंकली. १७१४ मताधिक्य त्यांनी मिळवले.

लोबोंना दिलासा; कळंगुटमध्ये भाजप उमेदवार फ्रेन्झीलिया रॉड्रिग्ज विजयी

उसगाव गांजे! भाजप उमेदवार समीक्षा नाईक विजयी

उसगाव गांजे जागेवर भाजप उमेदवार समीक्षा नाईक ६,२९० मतांनी विजयी झाल्या आहेत.

लाटंबार्सेत कमळ फुलले; अटीतटीच्या लढतीत भाजप विजयी उमेदवार पद्माकर मळीक विजयी

लाटंबार्सेत कमळ फुलले. अटीतटीच्या लढतीत भाजपचे विजयी उमेदवार पद्माकर मळीक हे 980 मतांची आघाडी मिळवून विजयी

होंडामध्ये भाजप उमेदवार नामदेव च्यारी 9,816 मतांनी विजयी

होंडामध्ये भाजप उमेदवार नामदेव च्यारी ९,८१६ मतांनी विजयी झाले आहेत. इथं आरजीच्या उमेदवाराला १,१०७ मते मिळाली असून, काँग्रेस उमेदवार ८२८ मतांपर्यंत मजल मारु शकला.

सांताक्रूझमध्ये काँग्रेस उमेदवार शायनी ओलिव्हरा 918 मतांनी आघाडीवर

सांताक्रूझ काँग्रेसची उमेदवार शायनी ओलिव्हरा २,६१४ मतांनी आघाडीवर आहे, त्यानंतर भाजपची सोनिया नाईक १,६९६ मतांसह दुसऱ्या, तर आरजीपी इस्प्रेन्सा ब्रागांसा १, ५४६ मतांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसने या मतदारसंघात ९१८ मतांची आघाडी घेतली आहे.

गोव्यातील पहिला निकाल हाती, भाजला मोठा धक्का; दवर्लीत काँग्रेस उमेदवार विजयी

जिल्हा पंचायत निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, भाजपला मोठा धक्का बसला आहे. दवर्लीत काँग्रेस उमेदवार फ्लोरियानो फर्नांडिस ४६१ मतांनी विजयी झाले आहेत. भाजप आमदार उल्हास तुयेकरांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

मायकल लोबोंना धक्का; कळंगुटमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर

कळंगुट जिल्हा पंचायत जागेवर काँग्रेसचा उमेदवार ५४२ आघाडीवर असून, भाजप उमेवार पिछाडीवर पडला आहे. काँग्रेस उमेदवार आघाडीवर असल्याने हा लोबोंसाठी काहीसा चिंतेचा विषय ठरत आहे.

कवळे मतदारसंघ निकाल; महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा उमेदवार आघाडीवर

कवळे जिल्हा पंचायत मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा उमेदवार ३५५८ मतांसह आघाडीवर आहे. तर आरजीपीच्या उमेदवाराला १,१२९ मते मिळाली आहे

लाटंबार्से मतदारसंघ मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण, भाजप उमेदवाराला 497 मतांची आघाडी

लाटंबार्से मतदारसंघ मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण. पोस्टल मते धरून भाजप उमेदवाराला 497 मतांची आघाडी. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु.

सत्तरीतून पहिला कल हाती; होंडा पंचायतीत भाजप उमेदवार नामदेव चारी आघाडीवर

सत्तरी तालुक्यातून पहिला कल हाती आला आहे. होंडा जिल्हा पंचायतीत भाजप उमेदवार नामदेव चारी आघाडीवर आहेत. तर, काँग्रेस पिछाडीवर आहेत.

Goa Zilla Panchayat Election Results 2025 LIVE: जिल्हा पंचायत निवडणूक भाजपसाठी लिटमस टेस्ट

जिल्हा पंचायत निवडणूक ही भाजपसह इतर पक्षांसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट ठरणार आहे. या निवडणुकीच्या निकालावर भविष्यातील अनेक समीकरणं ठरणार आहेत.

Goa ZP Election Result: गोव्यात कोण बाजी मारणार? मतमोजणीला सुरुवात

गोवा जिल्हा पंचायतीसाठी शनिवारी (२० डिसेंबर) मतदान पार पडले. यानंतर आज पंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी आज (२२ डिसेंबर) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सत्तरी, डिचोलीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा मिळून ५० मतदारसंघात २२६ उमेदवार रिंगणात आहेत. यास १५ ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीसाठी ६०० कर्मचारी तर १,२०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com