भरदिवसा युवकाने युवतीला चाकूने भोसकले

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाबाहेर (district hospital) भोसकण्याच्या घटनेने भाजपने (BJP) गोवा हे पर्यटन नव्हे तर गुन्हेगारी (Crime) स्थळ म्हणुन पुढे आणल्याचे परत एकदा स्पष्ट झाले आहे
Crime
Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात वाढते खून आणि खुनी हल्ले हा चर्चेचा विषय बनलेला असताना आज मडगाव जिल्हा रुग्णालयाबाहेर (District Hospital) बाहेर परशुराम गावस या मूळ दोडामार्ग येथे राहणाऱ्या युवकाने डिचोली या भागात राहणाऱ्या आणि रुग्णालयात काम करणाऱ्या संजिता गावकर या युवतीला सर्वासमोर चाकूने भोसकले. त्यानंतर त्याने स्वतःलाही जखमी करून घेतले. त्या दोघांनाही गंभीर अवस्थेत त्याच रुग्णालयात दाखल करून घेतले.

सदर युवक मूळ दोडामार्ग येथील असून तो डिचोली येथे एका कुरियर कंपनीत (Courier company) काम करत होता. ही युवतीही तिथलीच असून आज सकाळी तिला तो भेटण्यासाठी आला होता. सकाळी ती युवती 10 वाजता कामावरून सुटल्यावर त्याने तिला गाठले. त्यांचे तासभर बोलणे चालू होते. नंतर त्याने अकस्मात सुऱ्याने तिला भोकसले. सध्या त्या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांची जाबानी नोंदवून घेणे शक्य झालेले नाही. त्यामुळे हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही असे पोलीस निरीक्षक (PI) कपील नायक यांनी सांगितले.

Crime
सांतइस्‍तेव्‍ह येथे युवकाचा खून, खांडोळा पुलाखाली आढळला मृतदेह

दरम्यान गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीवर (Crime) विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी चिंता व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) गोवा भेटीला राजकीय पर्यटन म्हणुन डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी भाजप (BJP) विरुद्ध उफाळलेल्या असंतोषाच्या गर्मीचे मुख्यमंत्र्यांना लागलेले चटके थंड करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाबाहेर भोसकण्याच्या घटनेने भाजपने गोवा हे पर्यटन नव्हे तर "गुन्हेगारी स्थळ" म्हणुन पुढे आणल्याचे परत एकदा स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया कामत यानी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com