Dabolim Accident: दाबोळी अपघातातील जखमी 22 वर्षीय तरुणाचा उपचारादम्यान मृत्यू, साथीदाराची प्रकृती चिंताजनक; गोमॅकोत उपचार सुरु

Bike Accident Victim Dies In Goa: दाबोळी विमानतळासमोर अपघातामध्ये जखमी झालेल्या महादेव शंकराप्पा मदार (22) या तरुणाचा उपचारादरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.
Dabolim Accident
Dabolim AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Young Man Dies After Accident Near Dabolim Airport

वास्को: दाबोळी विमानतळासमोर अपघातामध्ये जखमी झालेल्या महादेव शंकराप्पा मदार (22) या तरुणाचा उपचारादरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. त्याच्या दुचाकीवर मागे बसलेल्या माबूसाब नदाफ याच्यावर उपचार सुरु आहेत.

दाबोळी विमानतळासमोरच्या रस्त्यावर अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवेवाडे येथे राहणारे महादेव व माबूसाब हे दोघे दुचाकीने दाबोळी चौकातून नवेवाडेकडे चालले होते. यावेळी महादेव हा दुचाकी चालवत होता. ते दाबोळी विमानतळासमोरच्या रस्त्यावर पोहोचले असता, अचानकपणे महादेवचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यामुळे महादेव आणि माबूसाब गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तिथेच उपचारादरम्यान महादेवचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी वास्को पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक निखिल देसाई पुढील तपास करत आहेत.

Dabolim Accident
Dabolim Accident: दुर्दैवी! दाबोळी उड्डाण पुलावरून बॅरिकेड कोसळून वीज कर्मचारी ठार; क्रेनचालक पोलिसांच्या ताब्यात

खोर्ली पूलाजवळ अपघाात

काही दिवसांपूर्वी, जुने गोवे येथील खोर्ली रेल्वे पूलाजवळ मालवाहू टेम्पो, कार आणि दोन स्कूटर्स यांच्यात झालेल्या अपघातात एका महिलेसह चारजण जखमी झाले होते. फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने दोन स्कूटर आणि कारला धडक दिली. टेम्पो रस्त्याच्या मधोमध उलटल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती. अपघातातील चौघा जखमींना तात्काळ गोवा वैद्यकिय महाविद्यलयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त मिनी टेम्पोमधील शीतपेयाच्या बाटल्या रस्त्यावर पडल्याने त्या गोळा करण्यासाठी तेथील उपस्थित लोकांची एकच झुंबड उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com