

पणजी: नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय ‘आंतरराष्ट्रीय बिझनेस लेजर ट्रॅव्हल अँड एमआयसीई २०२६’ या प्रदर्शनात गोवा पर्यटन खात्याला सर्वात उदयोन्मुख एमआयसीई व सर्वोत्तम विवाह ठिकाण पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या तीन दिवसीय आंतराष्ट्रीय प्रदर्शनात पर्यटन क्षेत्रातील प्रवास व्यापार व्यावसायिक, एमआयसीई नियोजक, विवाह नियोजक, प्रसार माध्यमे यांचा सहभाग होता.
गोव्याच्या पर्यटन खात्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी हा क्षण आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. यामुळे आता गोव्यातील प्रवास आणि पर्यटन उद्योगाचा आत्मविश्वास वाढणार असल्याचे ते म्हणाले. पर्यटन सचिव संदीप जॅकीस यांनी सांगितले की, या क्षेत्रातील गोव्याच्या वाढत्या क्षमतेला या पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
या पुरस्काराचे वितरण प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यावेळी फेअरफेस्ट मीडिया लिमिटेड यांचे सीईओ संजीव अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
गोवा पर्यटन खात्याचा पुरस्कार पर्यटन उपसंचालक रॉडलीन मास्कारेन्हास, वरिष्ठ व्यवस्थापक विशेष नाईक, साहाय्यक पर्यटन अधिकारी सुदत्त कांबळी यांनी स्वीकारला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.