Wildlife Rescue Center: वन्यप्राण्यांसाठी गोवा सरकारचे महत्वपूर्ण पाऊल! राज्यात उभे राहणार बचाव केंद्र, वनमंत्री राणेंनी दिली माहिती

Vishwajit Rane: वन्यजीव जखमी किंवा आजारी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्याची सुविधा राज्यात मर्यादित आहे. त्यामुळे संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे, असे राणे यांनी सांगितले.
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जैवविविधतेचे संरक्षण आणि वन्यजीवांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, वन्यजीव बचाव केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी ‘वाईल्ड लाईफ एसओएस’ या संस्थेसोबत काम करणार असल्याची माहिती वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

जैवविविधतेच्या दृष्टीने गोवा हे एक समृद्ध आणि संवेदनशील क्षेत्र आहे. येथे अनेक दुर्मिळ वन्य प्राणी, पक्षी आणि सर्पप्रजाती आढळतात. परंतु, जैवसंवेदनशील भागात वाढती लोकसंख्या, रस्ते व वीज प्रकल्प, तसेच वन्यजीवांचे मानवी वस्त्यांमध्ये अतिक्रमण या कारणांमुळे वन्य प्राण्यांच्या दुर्घटना वाढल्या आहेत.

Vishwajit Rane
Wildlife Conflict: गोव्यात आज अस्वल दिसले, उद्या गवा दिसेल! या मुक्या जीवांनी जायचे तरी कुठे?

सध्या वन्यजीव जखमी किंवा आजारी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्याची सुविधा राज्यात मर्यादित आहे. त्यामुळे ‘वाईल्ड लाईफ एसओएस’ संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे, असे राणे यांनी सांगितले.

Goa News: गोव्यासारख्या साक्षरता आणि सुशिक्षिततेच्या दृष्टीने अग्रेसर असणाऱ्या राज्यात दिवसेंदिवस इथल्या सत्ताधाऱ्यांची वक्रदृष्टी वन्यजीव आणि जंगलांच्या अस्तित्वाला घाला घालण्यास कारणीभूत ठरलेली आहे
Wildlife Week | TigerCanva

आपत्कालीन मदत आणि पुनर्वसन

‘वाईल्ड लाईफ एसओएस’सारख्या अनुभवी संस्थेच्या सहकार्याने प्रस्तावित बचाव केंद्र हे केवळ वन्यजीवांची तातडीने सुटका करणार नाही, तर त्यांना वैद्यकीय उपचार पुरविणार आहे. तसेच पुनर्वसन आणि आवश्यकतेनुसार नैसर्गिक अधिवासात परत सोडण्याची प्रक्रिया देखील राबवली जाईल. या केंद्रात प्रशिक्षित कर्मचारी, व्हेटर्नरी डॉक्टर्स, आधुनिक उपकरणे आणि आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com