

पणजी: यंदाच्या मान्सून हंगामात १ जून ते २३ ऑगस्ट या कालावधीत पडलेला पाऊस गतवर्षीच्या तुलनेत २८.४३ इंच कमी असून, पावसात सरासरीच्या तुलनेत अजूनही ३० टक्क्यांची घट असल्याचे राज्य हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
मात्र, रविवारी सकाळपर्यंत वाळपईत ९९.२० इंच पावसाची नोंद झाली होती. रविवारी दिवसाही पाऊस झाल्याने वाळपईत पावसाने इंचांची शंभरी गाठल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा राज्यात मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला; परंतु सुरुवातीचे काही दिवस कोसळल्यानंतर पावसाने सातत्याने विश्रांती घेतली.
त्यामुळे पावसाच्या सरासरीत झालेली घट अजूनही कायम आहे. गतवर्षी १ जून ते २३ ऑगस्ट या काळात राज्यात ९८.४८ इंच पाऊस पडला होता. दरम्यान रविवारी रात्री पणजी आणि परिसराला जोरदार पावसाने झोडपले.
वाळपईत इंचांची शंभरी : राज्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस वाळपईत झाला असून, सर्वांत कमी पाऊस पणजीत (४४.१५ इंच) पडला आहे. पणजीसह दाबोळी आणि मुरगाव या तीन केंद्रांवर आतापर्यंत पावसाने इंचांचे अर्धशतक गाठलेले नाही. हवामान विभागाने २९ ऑगस्टपर्यंत पाऊस पडणार नसल्याचा अंदाज वर्तविला असला, तरी काही भागांत पावसाचा शिडकाव सुरूच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.