Goa Weather Update
Goa Weather Update Dainik Gomantak

Goa Weather Update : ‘मुसळधार’ने कोट्यवधींचे नुकसान; वाहतुकीवर परिणाम

Goa Weather Update : २ कोटींची मालमत्ता वाचविण्यात ‘अग्निशमन’ला यश
Published on

राज्यात पावसाचा जोर सुरूच असून शुक्रवारी सकाळपासून दुपारपर्यंत राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पावसाने झोडपून काढले. तर मॉन्सून सुरू झाल्यापासून म्हणजेच १ जून ते ११ जुलैपर्यंत गोवा अग्निशमन दलाने २ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता आणि १५६ मानवी जीवांना वाचविले आहे.

यंदाच्या मॉन्सूनमध्ये आतापर्यंत १ कोटी ३ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसानही झालेले आहे.

मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मागील २४ तासांत राज्यात एकूण १८.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात एकूण १६५५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच अंजुणे धरणातून आज (१२ जुलै) पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने

Goa Weather Update
Goa Assagao : पूजा शर्मा हिला दिलासा नाहीच; अटकपूर्व जामीन फेटाळला

प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाळा सुरू झाला म्हणजे झाडे कोसळणे, घरे कोसळणे, कोणी पाण्यात बुडला, जनावरे अडकली, झाड पडल्याने रस्ता बंद झाला अशा घटना घडतात. यावेळी जनजीवन सुरळीत करण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. पावसाळ्यात अग्निशमन दल आणि वीज खाते यांच्या कर्मचाऱ्यांना सदोदित सतर्क राहावे लागते. आपण पोलिस व इतर सुरक्षा दलांचे काम पाहतो; परंतु धो-धो पावसात सर्वसामान्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अग्निशमन दल कार्यरत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com