Goa Weather Update : ठिकठिकाणी पडझड; सुदैवाने अनर्थ टळला

Goa Weather Update : पावसाचा दणका ः काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम; अग्निशमन दलाचे मदतकार्य युुद्धपातळीवर
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरूच आहे. त्‍यामुळे कोट्यवधी रुपयांच्‍या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने जीवितहानी घडल्‍याचे वृत्त नाही. वीजवाहिन्‍यांवर झाडे पडल्याने वीज खात्‍याला मोठा फटका बसला. बचावकार्य करताना अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली. बाणावलीत दुचाकीवर माड पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. नावेली, नार्वे, साळगाव, कासारवर्णे, पेडणे आदी भागांतही पडझड झाली आहे.

Goa Weather Update
Agonda News : कार्य संस्मरणीय असेल, तरच समाजाकडून दखल : शांताजी नाईक गावकर

बाणावली मारिया हॉलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी दुपारी माड कोसळून लिझा फर्नांडिस (वय ४६ वर्षे) ही दुचाकीस्वार महिला जखमी झाली. तिला तत्काळ उपचारासाठी हॉस्पिसिओत नेले. अग्निशामक दलाने माड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बाणावली येथील मारिया हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर माड उन्मळून बाणावलीतून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या लिझा यांच्या दुचाकीवर पडला. अचानक त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्या रस्त्यावर पडल्या, तर त्यांची दुचाकी रस्त्याशेजारील गटारात पडली.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून कोलवा पोलिसांसह रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाला या अपघाताची माहिती दिली. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्यावर लिझा यांना इस्पितळात नेले. लिझा यांच्यावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com