Agonda News : कार्य संस्मरणीय असेल, तरच समाजाकडून दखल : शांताजी नाईक गावकर

Agonda News : चंद्रकांत म्हाळशींसह विविध मान्यवरांचा सत्कार
Agonda
Agonda Dainik Gomantak
Published on
Updated on

Agonda News :

आगोंद, देवबाग-काणकोण येथील श्री विघ्नहर्ता महागणपती ही संस्था केवळ धार्मिक कार्य करत नसून समाजातील ‌विद्यार्थी वर्गापासून वयोवृध्दांना समाजकार्याद्वारे मदत करीत असते.

डॉ. विठ्ठल देसाईंच्या स्मरणार्थ चंद्रकांत म्हाळशींचा सत्कार हा योग्य व्यक्तीचा सत्कार समाजाने घडवून आणलेला आहे, असे उद्‍गार त्यांचा सत्कार करताना प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शाताजी गावकर यांनी काढले.

चंद्रकांत म्हाळशी यांनी श्री मल्लिकार्जुन देव व श्री देव अवतार पुरुष यांची सेवा अगदी निष्ठेने आणि भक्तीने केलेली आहे‌. त्यांनी केलेली सेवा संस्मरणीय आहे, आज त्यांचे वय झालेले आहे तरीही त्यांची देवावरची निष्ठा आणि भक्ती कायम आहे, असे शांताजी गावकर म्हणाले.

व्यासपीठावर नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर नगरसेवक धीरज नाईक देसाई, उपजिल्हाधिकारी मधु नार्वेकार, मामलेदार मनोज कोरगावकर, निराकार देवस्थानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई, मधुकर देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट शेतकरी प्रकाश देसाई, क्रीडा क्षेत्रात कार्य केलेले सूर्यनारायण कोमरपंत, साईश पंढरी कोमरपंत, अक्षय कोमरपंत यांचा गौरव करण्यात आला. तर घुमट वादक कलाकार नेहाल संतोष कोमरपंत, ओंकार नारायण कोमरपंत यांना उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून गौरविण्यात आले. सोयरू कोमारपंत यांनी आभार मानले.

Agonda
BIS Recruitment 2022| BIS मध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू; 10वी ते PG पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

कारसेवकांसह समाजसेवकांचा गौरव

समाजसेवा पुरस्काराने नगराध्यक्ष रमाकांत ‌‌नाईक गावकर यांचा सत्कार करण्यात आला. वयोवृद्ध समाज सेवा पुरस्काराने भाग्यश्री व कुशाली कोमरपंत या जोडप्याचा सत्कार मान्यवरांहस्ते करण्यात आला.

सुरज भैरेली, सुचेंद्र देसाई, स्वर्गवासी संदेश देसाई व सोयरू कोमारपंत या अयोध्येत १९९२ साली गेलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. हे पुरस्कार आनंद कोमरपंत व रवी कोमरपंत यांनी पुरस्कृत केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com