Goa Water Shortage : मॉन्सून लांबणार; ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची चिंता

जलस्रोत खाते : धरणातील पाणीसाठेही खालावले; जूनच्या मध्यापर्यंत पुरेल इतके पाणी
Goa Water Shortage
Goa Water ShortageGomantak Digital Team

गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठा झपाट्याने खालावला असून जूनच्या मध्यापर्यंत पुरेल इतके पाणी धरण साठ्यांमध्ये आहे. अशातच मॉन्सून राज्यात दाखल होण्यासाठीचा अवधी वाढल्याने पाणीटंचाईचे संकट तीव्र होताना दिसत आहे. सरकारच्या जलस्रोत खात्याच्या वतीने मे महिन्याच्या मध्यापर्यंत पाणी पुरेल, असा अंदाज व्यक्त केला होता. आता मॉन्सून पाऊस लांबल्याने पाणीटंचाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जलस्त्रोत खात्याच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या पाणीपुरवठ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या साळावली धरणामध्ये यंदा केवळ 26 टक्के पाणी शिल्लक आहे. तर अंजुणे धरणामध्ये केवळ12 टक्के पाणी आहे. हीच स्थिती इतर आमठाणे, पंचवाडी, चापोली आणि गावणे धरणांच्या बाबतीत आहे. याही धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे.

Goa Water Shortage
Healthy Tips: तुम्ही सॅलडमध्ये लिंबू अन् मीठ टाकतायं? वेळीच व्हा सावध

राज्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाची अपेक्षा असते. मात्र, गेल्या काही वर्षांतला अनुभव पाहता पाऊस जूनच्या मध्यापर्यंत राज्यात दाखल होत नाही. अशात मॉन्सून यंदा 1 जूनऐवजी 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो आणि तो राज्यात दाखल होण्यासाठी पुढील आठवडाभर घेतो हा अनुभव आहे.

Goa Water Shortage
Leopard In Sanquelim: साखळीत बिबट्याचा वावर; कुत्री होतायेत गायब, सुर्ला येथे वासरावर हल्ला

त्यामुळे राज्यात साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत पाऊस दाखल होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यासाठी पुढील महिनाभर पाण्याचा वापर अत्यंत संयमाने करणे गरजेचे आहे

सध्याची पाणी पातळी मीटरमध्ये व शिल्लक पाणीसाठा टक्क्यांमध्ये

  • अंजुणे 71.46 मीटर 12%

  • गावणे 56.38 मीटर 41%

  • अमठाणे 46.46 मीटर 57%

  • चापोली 31.70 मीटर 46%

  • साळावली 30.52 मीटर 26%

  • पंचवाडी 16.44 मीटर 7%

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com