Goa: कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प लवकरच होणार सुरु: मायकल लोबो

म्हापसा बाजारपेठेतील (Mhapsa markets) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तसेच काही नगरसेवकांच्या विनंतीनुसार गणेशोत्सवातील श्रीमूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
Minister Michael Lobo
Minister Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा (Mhapsa) शहरातील प्रतिदिन किमान पाच टन ओल्या कचऱ्यावर साळगाव येथील प्रकल्पात प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू केली जाईल. पण त्यासाठी पालिकेने गांभीर्य दाखवणे आवश्यक आहे. नजीकच्या काळात ते प्रमाण दहा टनांपर्यंत वाढवण्यास कोणतीही अडचण नाही, असे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो (Minister Michael Lobo) यांनी स्पष्ट केले आहे. म्हापसा बाजारपेठेतील (Mhapsa markets) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तसेच काही नगरसेवकांच्या विनंतीनुसार गणेशोत्सवातील श्रीमूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी नगरसेवक सुधीर कांदोळकर, कमल डिसोझा, ॲड. शशांक नार्वेकर (Shashank Narvekar), डॉ. नूतन बिचोलकर, तारक आरोलकर, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तुषार टोपले व इतरांची उपस्थिती होती.

Minister Michael Lobo
Goa Police: सापळा रचून हरमलात 3 लाखांचा गांजा जप्त

मंत्री लोबो पुढे म्हणाले, म्हापसा शहरात घरोघरी कचरा गोळा करण्याचे प्रमाण केवळ पन्नास टक्के आहे. गोळा केला जाणारा कचरा केवळ गणेशपुरी येथे एकत्रित केला जातो. त्यावर प्रक्रियाही होत नाही. म्हापशात कित्नयेक समस्या आहेत त्यात कचरा गोळा करण्याची समस्या सर्वाधिक गंभीर आहे. या शहरात दररोज सुमारे पस्तीस ते चाळीस टन ओला कजरा जमा होतो. काही महिन्यांपूर्वी टाळेबंदीमुळे म्हापसा बाजारपेठ तसेच उपाहारगृहे पूर्णत: बंद असल्याने तो आलेला कचरा समारे वीस टन व्हायचा. पण आता पुन्हा त्याचे प्रमाण वाढलेले आहे.

गोव्यात एकाही पंचायत किंवा पालिका क्षेत्रात स्वत:च्या भागातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही, असे नमूद करून लोबो म्हणाले, केवळ कचरा व्यवस्थापन मंडळाच्या साळगाव येथील प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. आता लवकरच दक्षिण गोव्यातही कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असून त्या प्रकल्पांच्या आधारे मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाणार आहे. सध्या साळगाव येथील प्रकल्पात थोडीफार वीजनिर्मिती केली जात आहे. दक्षिण गोव्यासाठीचा प्रकल्प येत्या एक-दोन महिन्यांत कार्यान्वित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. म्हापसा पालिकेने केलेल्या विनंतीनुसार आम्ही म्हापशातील पाच टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास मान्यता दिली आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

Minister Michael Lobo
Goa: एम.ई.एस. उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन

पूर्वी कळंगूट, कांदोळी भागांमध्ये ओल्या कचऱ्याच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले होते, असे नमूद करून लोबो म्हणाले, स्थानिक पंचायतींनी या समस्येसंदर्भात गांभीर्य दाखवल्यानेच ती समस्या कमी होऊ शकली. तेथील लोकांना त्या विषयासंदर्भात शिक्षित करण्यासाठी तीन-चार महिने लागले. काहींकडून दंडही वसूल करण्यात आल्याने इतरही लोक वठणीवर आले. पूर्वी त्या भागात दारोदारी कचरा गोळा केला जात असतानही काही लोक एखाद्या झाडाखाली अथवा वीजखांबाच्या मुळाशी कचरा फेकायचे. परंतु, जनजागृती केल्याने तसेच घरोघरी जाऊन कचरा व्यवस्थित उचलला जात असल्याने ओल्या कचऱ्याचा प्रश्न त्या भागांत आता भेडसावत नाही, असेही ते म्हणाले.

Minister Michael Lobo
Goa: प्रदूषणमुक्त इलेट्रिक वाहनांचे वितरण

म्हापसा पालिकेच्या कार्यपद्धतीबाबत टीका

मंत्री मायकल लोबो म्हणाले, की म्हापसा पालिकेकडे ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ भरपूर आहे; परंतु, घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम ते कर्मचारी व रोजंदारीवरील कामगार यांच्याकडून व्यवस्थित होत नाही. म्हणूनच तर लोक नाइलाजाने नाक्यानाक्यावर ओला कचरा टाकत असतात. म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या इमारतींशेजारी रस्त्यालगत किमान दोन-तीन टन ओला कचरा दररोज पहायला मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com