Waste Management: पेडणेत केवळ १.७५७ टन कचरा संकलन! हरमलमध्ये परिस्थिती बिकट, चिंबलमध्ये नदीप्रदूषण

Pernem Waste Processing: पेडण्यातील कचरा जातो तरी कुठे या प्रश्नाचे उत्तर खुद्द गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ शोधत आहे
Pernem Waste Processing: पेडण्यातील कचरा जातो तरी कुठे या प्रश्नाचे उत्तर खुद्द गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ शोधत आहे
Chimbel Waste Processing Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गावांतून दररोज टनावारी कचरा गोळा केला जात असताना पेडणे पालिका क्षेत्रातून दिवसाला केवळ १.७५७ टन कचरा संकलन होते. त्यातही १०० किलो ओला तर १५० किलो सुका कचरा गोळा केला जातो. यामुळे पेडण्यातील कचरा जातो तरी कुठे या प्रश्नाचे उत्तर खुद्द गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ शोधत आहे. पेडणे पालिका क्षेत्रात कचरा संकलन व्यवस्थितरीत्या केले जात नसावे, असे आता सरकारी यंत्रणेला वाटू लागले आहे.

पालिकेचे १० प्रभाग आहेत. ५०० किलो क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प पेडणे आयटीआय मागे असलेल्या कचरा संकलन केंद्रात आहे. तो विनावापर असल्याचे दिसून आले. तेथे कोणत्याही यंत्राचा वापर केला जातो अशी चिन्हे आढळली नाहीत. तेथे पहारेकरीही नव्हता. या केंद्रात पाय ठेवल्यावर प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीचा एम. के. आरोमॅटीक्स पहा प्रकल्प आहे.

मात्र तो सुरू असल्याची कोणतीची हालचाल तेथे नव्हती. त्याच्या बाजूलाच प्लॅस्टिकचा कचरा साठवलेल्या अवस्थेत पडून होता. पेडण्यात पूनर्वापर करता येण्याजोग्या कचऱ्याचेही तुकडे करण्यात येत असल्याचे दिसून आले. कंपोस्ट प्रकल्प आहे मात्र तो सुरू आहे असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. तेथे जळण्यासाठी वापरता येणारे १००० टन आरडीएफ दिसून आले. आता नव्याने तेथे कचरा साठवण्यास सुरुवात झाल्याने भविष्यात तो प्रश्न उद्‍भवणार असल्याचे दिसते.

चिंबल येथे प्लॅस्टिक कचऱ्याचे तुकडे केले जात नाहीत. तो कचरा केवळ साठवला जातो. ओला कचरा साळगावच्या प्रकल्पात पाठवला जातो. कचरा संकलन केंद्र अत्यंत अपुऱ्या जागेत असून ते कचऱ्याने भरून गेले आहे. सरकारने पुरवलेली यंत्रणा असल्यास ती या कचऱ्याखाली दबून गेलेली असेल.

Pernem Waste Processing: पेडण्यातील कचरा जातो तरी कुठे या प्रश्नाचे उत्तर खुद्द गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ शोधत आहे
Waste Management: बायोडायजेस्टर उघड्यावर, कचरा जाळण्याचा घातक प्रकार; कचरा व्यवस्थापनाची पोलखोल

नदीत कचरा!

जुने गोवे-खोर्ली येथे नदीत कचरा फेकण्याचे प्रकार याआधी उघडकीस आले होते. तेथे असलेले कचरा संकलन केंद्र बंद करून नव्या तात्पुरत्या जागी ते हलवण्यात आले आहे. तेथेही प्लॅस्टिक कचऱ्याचे तुकडे केले जात नाहीत. जुनेगोवे येथे कचरा संकलन प्रश्नामुळे पंचायतीने कंत्राटदार बदलला आहे. हरमल येथे कचरा संकलन केंद्र असलेल्या ठिकाणी दोन थडगी आहेत. तेथे ५०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, असे सांगण्यात आले. मात्र कचरा साळगावला पाठवण्यातच रस असल्याचे दिसून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com